• Sat. Sep 21st, 2024
प्रेयसीच्या नवऱ्याचं व्यसन हेरलं, शिवारात नेऊन काटा काढला, पण एका गोष्टीने प्रियकर अडकला

नागपूर :जिल्ह्यातील धापेवाडा भडंगी रोडवर असलेल्या पुर्ती कंपनीच्या मागे असलेल्या सोनापार शिवारात एका तरुणाचा मृतदेह दिसल्याने खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, विजय रूपरावजी ठाकरे (वय ४५ वर्ष, रा. बेल्लोरी तहसील कळमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण होत असे. सततच्या भांडणाला कंटाळून त्याची पत्नी आपल्या आठ वर्षाच्या मुलासोबत माहेर असलेल्या कन्याढोळ गावात राहत होती.

दरम्यान, मयत व्यक्तीच्या पत्नीचे आरोपी शरद ठाकरे नामक व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. याबाबत जेव्हा विजयला समजलं, तेव्हा त्याने पत्नीला विचारणा केली. मात्र तिने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र आपल्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला मिळाल्याचं समजताच तिने हा प्रकार प्रियकर शरदच्या कानावर घातला. विजय आपल्या प्रेम प्रकरणात अडथळे आणत असल्याने शरदने विजयची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

घटनेच्या दिवशी विजय हा त्याचा मुलाला भेटायला कन्याडोल गावात यायला निघाला होता, ही बाब आरोपी शरदला समजताच त्याने विजयच्या दारूच्या व्यसनाचा फायदा घेत त्याला धापेवाडा येथे आणले आणि दारू पाजली. त्याला दारू पाजत बेशुद्ध अवस्थेत धापेवाडा भडंगी रोडवर असलेल्या पूर्ती कंपनीमागे नेले. सोनपर शिवारात नेल्यानंतर गळा दाबून व गुप्तांगावर लाथा बुक्क्यांनी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. विजयचा मृत्यू झाल्याची खात्री होताच शरदने घटनास्थळावरून पळ काढला.

नवी मुंबईत पत्नीचा खून, पापक्षालनासाठी सोलापुरातील बाळूमामाच्या मंदिरात, प्रसाद खाताना अटक
१६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास धापेवाड्यातील एक व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली आणि त्यांनी धापेवाड्यातील लोकांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना ही माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच करवून घेतला पतीचा खून

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून मृताची ओळख पटताच या प्रकरणाचा थरार उलगडण्यास सुरुवात झाली आणि त्याआधारे आरोपी शरद ठाकरे (वय २८ वर्ष) याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर अजय चांदखेडे, कळमेश्वर पोलीस स्टेशनचे यशवंत सोळसे, सहाय्यक एसएचओ शरद गायकवाड, गुन्हे शाखेचे मन्नान नौरंगाबादे, गणेश मुधमाळी हे तपास करत आहेत.

नवी गाडी घेतली, कागदपत्र जुळवून परतताना सिमेंट मिक्सरची धडक, तरुणाच्या मृत्यूने गाव हळहळलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed