• Sat. Sep 21st, 2024
राज्याच्या राजकारणात १५ दिवसात दोन मोठे भूकंप होणार,प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ

पुणे :महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि इतर प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे तसेच महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्यांवरुन विसंगती आढळून आली होती. आज काही माध्यमांनी अजित पवार यांच्यासह ४० ते ४५ आमदारांचा गट बाहेर पडणार असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काही स्फोट होईल हे कोणी सांगू शकत नाही. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं विधान केले आहे. ” येत्या १५ दिवसात महाराष्ट्रात मोठ राजकारण होईल म्हणून आपण १५ दिवस वाट पाहूया, १५ दिवसात राज्याच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

MI vs KKR Highlights: मुंबई इंडियन्सचा KKR वर सहज विजय, सूर्याच्या नेतृत्त्वाखालील पलटणने मारली बाजी
पुण्यात बा भीमा या पुस्तक प्रकाशना साठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या वज्रमूठीबाबत त्यांनी मोठं भाकीत केलं आहे.
FIR मध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येची संपूर्ण कहाणी; वाचा कसं घडलं थरारक हत्याकांड

प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ वाजली आहे, नेमकं मोठं राजकारण काय होईल. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या राजकारणात नेमकं काय होणार आहे ? याची कल्पना अजून कोणालाच नाही.. म्हणून येणाऱ्या दिवसात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सचिन-अर्जुनचा अजब योगायोग… केकेआरचा संघ, पहिले षटक अन्… नेमकं काय घडलं पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed