मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बीड : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं वाटत असल्याचं म्हटलं. पण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून उभारी येते, असंदेखील त्यांनी नंतर म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला.
“पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर हा (धनंजय मुंडे) सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल. वारसाच मोडला मग. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवण्याची हिंमत पंकजा मुंडेंकडे आहे. खूप गरिबीतली जात त्यांनी वर काढलेली आहे आणि या जर बाजूला गेल्या तर ती जात पूर्ण जेलमध्ये घालेल हा, गोरगरिबांना अन्नापासून वंचित करेल हा”, असा घणाघात मनोज जरांगे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केला.
जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
“यापुढे मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मराठ्यांसोबत मारामारी बंद. नाहीतर मी पठ्ठ्या आहे. दोन-तीन वेळा तुला वाचवले आहे. नाहीतर तुला मध्ये घालीन. माझ्या खुनाच्या कटात शंभर टक्के तू आहेस. मात्र तुला वाचवलेले आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
“माझ्या घातपाताच्या प्रकरणात तू आहेस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शुक्ला यांना घेऊन बसलास. तिथे तुला वाचवले, तो सगळा डाटा फडणवीसांकडे आहे. तो कधी पण बाहेर येऊ शकतो, हे मी जबाबदारीने बोलत आहे”, असा दावा जरांगे यांनी केला.
“तू पाप करायचं बंद केलं आणि मराठ्यांना त्रास देणं बंद केलं तर काहीतरी होईल. नाहीतर तुझे वाईट दिवस येणार. चांगले दिवस येणार नाहीत”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
“कायदा सुव्यवस्था म्हटलं की आपलंच लफडं आहे हे त्याला कळलं. पत्रकारांना बोलू देत नाही याचा अर्थ म्होरक्याच तो आहे. बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा म्होरक्याच तो आहे. मराठा आणि ओबीसीमधलं प्रेम तोडायला धन्या कारणीभूत. तू कितीही खळ्या खंदल्या तरी तुला माती काढू देत नाही”, अशी खोचक टीका जरांगेंनी केली.
“महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना मध्ये टाक असं म्हणायला पाहिजे. तिथं तोंड उचलत नाही. खून करणारे, चोरी करणारे, खंडणी मागणाऱ्यांचं समर्थन करायला लागला म्हणून धन्या संपला”, अशी टीका देखील जरांगेंनी केली.
“जातीपातीचं राजकारण यानेच आणलं, सगळ्याच जातीपातीच्या लोकांचा कार्यक्रम केला. बलात्कार करणाऱ्याला सांभाळावं लागेल, असं म्हणतो. आता तू पश्चाताप करायला लागला. तुला उशिरा का होईना शहाणपण आलं. बरं झालं. तुझ्यामुळे बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय. फक्त तुझ्यामुळे”, असादेखील घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता आलं नाही. मराठ्यांसह सगळ्या जातींनी मोठं केलं आणि टोळीने ओरबाडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊ दिला, ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला. तू शहाणा हो. मराठ्यांच्या नादी लागू नको. कोणताही पक्ष, कोणीही तुला जवळ करणार नाहीत. काळ यायचा, काळ गेला. आता मध्ये जायची वेळ आली आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा