महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातात कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काम करायचं असेल तर कुठूनही करु शकतो. नुसतंच वण वण फिरल्यावर काम होतं, असं नसतं. महागाई वाढत चालली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात, नागपूरमध्ये येणारी एअरबस गुजरातमध्ये गेली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार स्थापन करुन एकनाथ शिंदे यांनी ८ महिन्यांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. ८ वर्षांपेक्षा अधिक सरकार मोदींचं केंद्रात आहे. पण, तुम्ही जनतेला मुलासारखं सांभाळू शकले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील जे बोलले ते तुम्हाला पटतंय का? शिवसेनाप्रमुखांचं योगदान नाकारता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून काड्या कशाला घालता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाहांची टीका, नितीशकुमारांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
ठाण्यात रोशनी शिंदे हिला मारहाण करण्यात आली. ती सांगत होती मातृत्त्वाचे उपचार घेत होती. तिला मारहाण करण्यात आली होती. पोलीस तिची तक्रार घेण्याऐवजी तिच्यावरच गुन्हे दाखल करत होते. मग तिला आम्ही मुंबईतील रुग्णालयात आणलं. त्यामुळं मी फडतूस हा शब्द गृहमंत्र्यांसाठी वापरला,असं उद्धव ठाकरे म्हणाले. संघाला, नरेंद्र मोदींना आणि अमित शाहांना असा कारभार मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
अन्याय करणारे आणि गुलाम करणारे त्या खूर्चीवर बसून द्यायचं नाही, ही शपथ घ्यायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मतदानातून तुम्ही या सर्वांना उत्तर देऊ शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.