• Sat. Sep 21st, 2024

तिघी मैत्रिणी, लग्नं झालेली, मुलंही आहेत, घर सांभाळत एकाचवेळी पोलिसात भरती, लेकींचं होतंय कौतुक

तिघी मैत्रिणी, लग्नं झालेली, मुलंही आहेत, घर सांभाळत एकाचवेळी पोलिसात भरती, लेकींचं होतंय कौतुक

बारामती, पुणे :मनात दुर्दम्य इच्छा शक्ती आणि ठाम निर्धार असेल तर अनेक अडचणींवर मात करत यशाचे शिखर गाठता येते. याचा प्रत्यय बारामती तालुक्यातील सोमेश्वर ग्रामस्थांसह तालुक्यातील नागरिकांना आला आहे. येथील तीन विवाहित तरुणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.पहाटे तीनला उठायचे… स्वयंपाक करून पाच किलोमीटर सायकल वरून ग्राऊंडला पोहचायचे… दोन तास मनापासून ग्राउंडवर सराव करायचा आणि पुन्हा परतायचं… धुणीभांडी करायची….. पोरी शाळेला गेल्या की पुन्हा पाच किलोमीटरवरच्या अभ्यासिकेत जायचे. सायंकाळीदेखील ग्राउंड करून मगच घर गाठायचे… अपार कष्ट, सरावातील सातत्य कायम ठेवलं आणि मेरीटमध्ये येत बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील मीनाक्षी कर्चे, आरोही शिळीमकर, दीपाली राणे या तीन विवाहित तरुणी पोलीस दलात भरती झाल्या आहेत.

दीपाली राणे यांच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. एक चार वर्षांचा मुलगा आहे. पती ज्युबिलंट कंपनीत कंत्राटी नोकरीत आहेत. राष्ट्रीय पातळीपर्यंत खो-खो खेळल्याने पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले. सासू-सासऱ्यांनी लेकीसारखी मदत केली. दीपाली राणे या जवळार्जुन (ता. पुरंदर) गावच्या. पती पश्चिम बंगालला नोकरीत. लग्नाआधी दहावीच झालेली. पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. भाऊ सागर याच्या सोबत सोमेश्वरला विवेकानंद अभ्यासिका व काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर तयारी केली. आणि मेरीटमध्ये भरती झाली. गणेश सावंत, लक्ष्मण भोसले, विक्रम बोंद्रे, नीतेश शिंदे,अंकुश दोडमिसे आदींनी मार्गदर्शन केले आणि मु. सा. काकडे महाविद्यालयाने मैदान उपलब्ध केले.

Pune : बोगस आमदार, गाडीवर लावलेल्या लोगोमधून पितळ उघडे; पोलिसांनी दणका देत केली कारवाई
या तिन्ही मैत्रिणी येथील ‘विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यास करायच्या. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या मातांनी गेली पाच वर्षे प्रचंड त्याग व मेहनत केली आहे. संसार पेलत, बाहेरच्यांच्या टीका पचवत पोलीस भरतीच्या कठीण परीक्षेत नवतरुणींना लाजवेल, असे यश मिळविले आहे. तिघींनीही मागच्या भरतीतले अपयश पुसून काढले. मीनाक्षी यांची पुणे लोहमार्ग, आरोही यांची ठाणे पोलीस, तर दीपाली यांची पिंपरी पोलिसांत निवड झाली आहे. मीनाक्षी यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली. आहेत. त्यांची मोठी मुलगी आठवीला तर लहान मुलगी पाचवीत शिकते. पती आणि सासू-सासऱ्यांनी पाठबळ दिले. त्यांची आई प्रेरणा बनली.

आता मोबाइलवर कळणार जमिनींचे खटले! ‘ईक्यूजेकोर्ट’ अ‍ॅपमुळे ‘या’ सेवा घरबसल्या शक्य
लग्नाआधी बारावीच शिक्षण होते नंतर पदवीपर्यंत शिक्षण घेतले. पदवी झाल्यावर पोलीस भरतीचे मनावर घेतले. जबाबदाऱ्या सांभाळताना कसरत व्हायची. पण, माझ्या मुलीही म्हणायच्या पोलिसाच्या ड्रेसमध्ये बघायचंय. मग बळ वाढायचं. प्रयत्नात सातत्य आणि कष्ट घेतले आणि आज यश मिळाले, अशी भावना मीनाक्षी कर्चे यांनी व्यक्त केली.

अभ्यासिकेतून रात्री घरी नऊला परतायचे. यावेळी सासुबाई स्वतःच स्वयंपाक करून ठेवायच्या. सासूबाईंनी मुलाला कधी एकटं सोडलं नाही. मी पोलीस भरतीसाठी प्रचंड मेहनत घेऊन परीक्षा दिली. अन् मैत्रिणीचा फोन आला. आणि माझं सिलेक्शन झालंय असं समजलं. घरच्यांनी जणू दिवाळी साजरी केली, अशी भावना आरोही शिळीमकर यांनी व्यक्त केली.

अंगावर खाकी वर्दी असावी, अशी सुरुवातीपासूनच मनात इच्छा होती. त्यानुसारच मी भरतीसाठी मेहनत घेत होते. त्याचे चांगले फळ मिळाले. पुढे फौजदार होण्याचा मनोदय दीपाली राणे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed