अहमदनगर :‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना त्यावेळी आपण चांगला सल्ला देत होतो. तेव्हा एक दिवस असा गेला नाही की मी त्यांना शुद्ध आचारण ठेवण्याचा सल्ला दिला नाही. तरीही पुढे त्यांनी मार्ग बदलला. आता त्यांच्यावर ही वेळ आली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करीत आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. यामध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक झाली आहे. आता केजरीवाल यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलाविले आहे. केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना हजारे यांच्या आंदोलनातून झाली आहे. त्यावेळी केजरीवाल हे हजारे यांचे शिष्य मानले जात होते.
गेल्यावर्षी ‘इडी’वाले माझ्याकडेही आले होते, राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचं वक्तव्य
आता सुरू असलेल्या या कारवाईसंबंधी प्रचार माध्यमांनी हजारे यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर हजारे म्हणाले, ‘आमच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनातूनच आम आदमी पार्टीचा जन्म झाला. त्यांनी राजकाराणात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र आमचा तो मार्ग नसल्याचे सांगितले. त्यावेळी एकही दिवस असा नव्हता की मी या लोकांना शुद्ध आचारविचासंबंधी सल्ला दिला नाही. मला आता दु:ख होत आहे की, सिसोदियासारखा नेता तुरुंगात आहे. तुरुंगात जावे, पण समाज आणि देशाच्या भल्यासाठी. स्वत:च्या भल्यासाठी नाही, असे मी मानतो,’ असेही हजारे म्हणाले.राळेगणसिद्धीमध्ये जाऊन हत्या करेन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी
केजरीवाल यांच्या चौकशीसंबंधी अण्णा हजारे म्हणाले, ‘मी पूर्वीच केजरीवाल यांना एक पत्र लिहिले होते. त्यांना सांगितले होती की हा दारूचा विषय सोडून द्या. दारूमुळे कोणाचेही भले झालेले नाही. पैशासाठी काहीही करणे अयोग्य आहे. चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे,’ असा सल्लाही हजारे यांनी दिला आहे.