• Sat. Sep 21st, 2024

करोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकार 'इन अ‍ॅक्शन मोड'; करोना लशींबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय

करोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकार 'इन अ‍ॅक्शन मोड'; करोना लशींबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय

State Govt Will Purchase Corona Vaccines : राज्यात १५ टक्क्यापेक्षा कमी व्यक्तींनी बूस्टर मात्रा घेतलेली आहे. सहआजार असलेले, गर्भवती महिला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे आहे.

 

corona vaccine file photo.
करोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकार ‘इन अ‍ॅक्शन मोड’; करोना लशींबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :करोना रुग्णसंख्येत वाढ होत असली, तरी पालिकेसह सार्वजनिक रुग्णालयांमध्ये लसडोसची उपलब्धता नाही. ही उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशाची वाट न पाहता राज्य सरकार उत्पादकांकडून खरेदी करणार आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारकडे लसडोससाठी विचारणा करण्यात येत आहे. राज्याच्या गरजेनुसार मागणीही नोंदवण्यात आली आहे. तरीही अद्याप लसडोस उपलब्ध नाहीत.सरकारने उत्पादकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, सध्या बूस्टर डोसची उपलब्धता किती आहे, या संदर्भात विचारणा केली जात आहे. सार्वजनिक आरोग्ययंत्रणेप्रमाणे पालिका रुग्णालयांमध्येही मात्रांची उपलब्धता नाही. खासगी रुग्णालयांनी लसमात्रांची साठवणूक करण्यासह त्याचे व्यवस्थापन सांभाळणे खर्चिक होत असल्याने अनेक ठिकाणी ही उपलब्धता बंद केली आहे. सध्या राज्यात एकाही ठिकाणी डोस उपलब्ध नाहीत. राज्यातील मात्रांच्या गरजेनुसार मागणी नोंदवण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. तोपर्यंत केंद्र सरकारकडून नोंदवण्यात आलेल्या लसमात्रांची उपलब्धता झाली, तर त्याचीही मदत होईल. पालिकेनेही बंद करण्यात आलेली काही लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी कर्बोव्हॅक्स, तसेच कोव्हिशील्डचे काही डोस वाया गेले.

ताप कोणताही असो निदान होणार अचूक; मुंबई महानगरपालिका रुग्णालयांत ‘या’ चाचण्या उपलब्ध
लसीकरणाला सुरुवात होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. लसीकरणाचा प्रभाव किती प्रमाणात झाला याची वैद्यकीय माहिती ‘आयसीएमआर’कडे असणे अपेक्षित आहे. फ्लू प्रमाणे करोना संसर्गाला प्रतिबंध करणारी लस अजून काही वर्ष घ्यावी लागेल. – डॉ. माधव साठे, सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed