• Sat. Sep 21st, 2024
ढोल पथकासोबत पुण्याला, परतताना काळाचा घाला; १८ वर्षीय जुई कुटुंबाला सोडून गेली

रायगड (खोपोली): जुन्या मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर काल खोपोली जवळ झालेल्या बसच्या भीषण दुर्घटनेत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. जुई दीपक सावंत असं या तरुणीचं नाव आहे तिचा तिथल्या ढोल ताशा पथकात समावेश होता. काल झालेल्या बस दुर्घटनेत सुमारे १२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्हयातील खोपोली जवळ बोर घाटात खासगी प्रवासी बसचा काल पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघात भिरवंडे (ता. कणकवली ) गावातील खलांतर वाडी येथील मुळ रहिवासी जुई दिपक सावंत (वय १८ सध्या. रा. गोरेगाव, मुंबई) हीचा जागीच मृत्यू झाला. पुणे येथे एका कार्यक्रमात ढोल पथकातील सहकारी म्हणून ती पुणे येथे गेली होती.

वज्रमूठसाठी नेत्यांची मांदियाळी; आज होणार नागपुरात बहुप्रतीक्षित सभा, असे आहे नियोजन…
बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) आणि गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून ते सर्व गोरेगाव येथे जात होते. या पथकातील अनेक कलाकार मुली आणि मुलं १४ ते २० वयोगटातील अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. जूई हीच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

जुई सावंत हिच्या जाण्याने मुंबई येथील गोरेगाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

कुख्यात अतिक अहमदसह भावाची गोळ्या झाडून हत्या; मुलाच्या एन्काउंटरनंतर तिसऱ्याच दिवशी घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed