धनंजय बुद्रुक येथील रहिवासी रोकडेश्वर शिंदे हा अल्पभूधारक शेतकरी असून वडिलांसोबत तो शेतीचा व्यवसाय करायचा. घरची संपूर्ण जवाबदारी त्याच्यावर होती. रोकडेश्वर यांचे वडील बालाजी शिंदे यांनी काही वर्षा पूर्वी मारतळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतून एक लाख २५ हजार रुपयाचे पीक कर्ज घेतले होते. तसेच मणिपूरम गोल्ड लोन या खाजी फायनान्सचे पाच लाख रुपयाचं थकीत कर्ज त्यांच्यावर होते. कर्जाच्या पैशातून त्यांनी गावात घर बांधले होते. मात्र, कर्जाची परतफेड त्यांना करता आली नाही.
वडिलांच्या डोक्यावर असलेलं हे कर्ज फेडता फेडता त्या तरुण शेतकऱ्याच्या नाकी नऊ आले होते.कर्ज वाढत जातं असल्याने तो चिंतेत देखील होता. त्यातच नापिकी तो हतबल देखील झाला होता. अखेर रोकडेश्वरने टोकाचं पाऊल उचललं. तो शुक्रवारी सकाळी तो शेताकडे कडे गेला. त्यानंतर त्याने आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. डोक्यावर कर्जाच डोंगर त्यातच मुलाने आत्महत्या केल्याने शिंदे कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच उस्माननगर पोलिसांनी घटस्थाळी धाव घेतली आणि पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणी उस्माननगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, अवघ्या २३ व्या वर्षात तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचल्याने एकच खळबळ उडाली असून या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या