नांदेड-साबेर मिर्झा
आमदार भीमराव केराम यांच्या किनवट येथील लोकार्पन व जनसंपर्क कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती यांचा उत्साहात साजरी करण्यात आली असून आ. केरामांसह अनेकांनी महामानवास मानवंदना देवून अभिवादन केले.
आज दि. १४ एप्रिल रोजी किनवट / माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांच्या किनवट येथील लोकार्पन व जनसंपर्क कार्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. तत्पुर्वी आ. भिमरावजी केराम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.
यावेळी आ. भिमरावजी केराम यांच्यासह स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवर, मारोती भरकड, माजी उपसभापती देवराव कुडमते, दत्ता आडे माजी सभापती, माधव कुमरे, मा. सरपंच, सुभाष कोहोड, मा. सरपंच अरुण मडावी, गोपाळ कनाके गुरुजी, राजाराम कोवे सरपंच, दिगंबर जुगनाके, मा. पं. स. सदस्य निळकंठ कातले, संतोष कनाके व अनेकांची उपस्थिती होती.