• Sat. Sep 21st, 2024
चारही बाजूंनी कुत्रे तुटून पडले, इवलासा डुग्गू ओरडायला लागला; कपड्यांना धरुन फरफटत नेलं

नागपूर:गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात नागपुरातील वाठोडा भागात तीन वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. सुदैवाने त्याची आई आणि परिसरातील नागरिक तिथे पोहोचल्याने अनर्थ टळला . मनपा प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नागपुरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे, शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांवर मोकाट कुत्रे रस्त्यावर फिरताना दिसतात. काही वेळा हे कुत्रे लोकांवर हल्लेही करतात, ज्यामुळे अनेक जण जखमीही झाले आहेत. हे सर्व होऊनही महापालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी कोणतीही विशेष पावले उचलत नसल्याचं दिसत आहे. शहरातील वाठोडा परिसरातील शिवजी पार्कजवळ घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

हा निरागस चेहरा पुन्हा दिसणार नाही! चिमुकला भरत खेळायला बाहेर पडला; काही वेळात अनर्थ घडला

डुग्गू दुबे असे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. दुबे कुटुंबीय वाठोडा परिसरात भाड्याने राहतात. घटनेच्या दिवशी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा डुग्गू घराबाहेर खेळत असताना आठ ते दहा कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांची टोळी त्याला खेचून जाण्याचा प्रयत्न करत होती. हा सर्व प्रकार एका घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

भटक्या कुत्र्यांचा हल्ला; १२ वर्षांच्या मुलाच्या पोटात सायकलचे हँडल घुसले, गंभीर जखमी

कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर घाबरलेला मुलगा जोरात ओरडू लागला. त्यामुळे त्याचे ओरडणे आणि रडणे ऐकून त्याची आई धावत घराबाहेर आली आणि कुत्र्यांचा पाठलाग करून आपल्या मुलाला सुखरूप वाचवले. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले. या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून महानगर पालिका प्रशासनाकडे कुत्र्यांना पकडण्याची मागणी केली जात आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भटक्या कुत्र्यांचा अन्नदाता; कुत्र्यांचं जेवण बनवण्यासाठी ठेवली स्वयंपाकीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed