• Mon. Nov 25th, 2024

    बारामतीत खळबळ! जमिनीच्या वादातून भावाने घेतला भावाचा बळी, नांगरणी पाहून येताना साधला डाव

    बारामतीत खळबळ! जमिनीच्या वादातून भावाने घेतला भावाचा बळी, नांगरणी पाहून येताना साधला डाव

    बारामती :वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाचा शेतातच दगडाने ठेचून निदर्यीपणे खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील सांगवी या गावात (दिनांक- १२ एप्रिल रोजी) सकाळी पावणे नऊ वाजता घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान खून करुन पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच आरोपीसह इतर दोन जणांवर खुनासाठी फूस दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या धक्कादायक व मनसुन्न घटनेची हकीकत अशी की, जुना सांगवी -पणदरे रोड येथील वडिलोपार्जित शेती गट नं. ४०१ वरून काकासो हिराचंद फडतरे व त्यांचे चुलते गणपत कृष्णा फडतरे ( रा.सांगवी ता.बारामती) यांच्यात वाद असून याबाबत बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी आडे आठ वाजता काकासो हिराचंद फडतरे व त्याचा भाऊ विनोद हिराचंद फडतरे हे दोघे मोटारसायकल वरून शेतातील नांगरणी पहाण्यासाठी गेले होते. यावेळी पहाणी करुन विनोद घरी जाण्यासाठी निघाला.

    आजरा तालुक्यात खळबळ; वडील,आई, मुलाला बांधले, तोंडही कपड्याने बांधले, २५ जणांनी घर लुटले
    यावेळी शेतात पाळत ठेवून असलेल्या चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे याने विनोद यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी विशालने विनोदच्या डोक्यात दगड मारला व ते झटापट करीत रस्त्यावर आले. यावेळी पुन्हा रस्त्यावर विशालने विनोदच्या डोळ्यात मोठा दगड मारला. या जबरी मारहाणीमुळे विनोदच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने तो रस्त्यावर निपचित पडला होता.

    ते दृश्य भयावह होते. यावेळी घटनास्थळावरून विशाल पळून गेला. ही खबर वाऱ्यासारखी गावात पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती.

    पाचगणीत खळबळ; रुम नंबर ११०, हॉटेल अलमिनारमध्ये मुंबईच्या पर्यटकाची आत्महत्या
    काकासो हिराचंद फडतरे यांनी विशाल गणपत फडतरे यांच्यावर विनोदचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हा खून करण्यासाठी फूस लावली म्हणून काका गणपत कृष्णा फडतरे व विक्रम गणपत फडतरे (राहणार – सांगवी, तालुका- बारामती) या तिघांविरुद्ध फिर्याद दिल्याचे सांगितले. तसेच खून करणारा आरोपी विशाल फडतरे यास ताब्यात घेतले असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी सांगितले.

    रत्नागिरी शहर परिसर हादरला; मित्रानेच केले मित्रावर सुरीने सपासप जीवघेणे वार, कारण काय?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed