• Sat. Sep 21st, 2024

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर, यंदा जूनमध्येच वारीचा मुख्य सोहळा

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर, यंदा जूनमध्येच वारीचा मुख्य सोहळा

पुणे :संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान रविवार दि.११जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार आहे. माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीतून निघून पालखी पुण्यातील भवानी पेठ, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करणार आहे. यंदाचा.पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.करण्यात येणार असून वारकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येणार आहे.

१४ जून : रोजी पुण्याहून सासवडकडे प्रस्थान.

१५ जून : रोजी सासवड मुक्काम.

१६ जून : जेजुरी.

१७ जून : वाल्हे.

विदर्भाच्या कापूस पंढरीत पांढऱ्या सोन्याची आवक वाढली, कापूस दराची नवी अपडेट, जाणून घ्या दर

१८ जून : श्रींचे नीरा स्नान, लोणंद.

१९ जून : लोणंद मुक्कामी.

२० जून : (चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले) तरडगाव.

२१ जून : विमानतळ फलटण.

२२ जून : बरड,

२३ जून : नातेपुते.

२४ जून : (पुरंदवडे गोल रिंगण पहिले) माळशिरस.

२५ जून : (खुडूस फाटा गोल रिंगण दुसरे) रात्री वेळापूर मुक्काम.

२६ जून : (ठाकूर बुवाची समाधी गोल रिंगण तिसरे),
(पहिला टप्पा संत सोपानदेव भेट) रात्री भंडीशेगाव मुक्काम.

२७ जून: (बाजीरावची विहीर उभे रिंगण दुसरे),
गोल रिंगण, रात्री वाखरी मुक्कामी.

२८ जून : (पादुका जवळ आरती व उभे रिंगण तिसरे) पंढरपूर.

२९ जूनला : पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा.

राळेगणसिद्धीमध्ये जाऊन हत्या करेन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी

३ जुलै पर्यंत पालखी पंढरपूर येथे मुक्कामी असणार असून पंढरपूर येथील गोपाळकाल्याच्या कार्यक्रम होऊन पालखीचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. ३ जुलै रोजी परतीच्या.प्रवासात वाखरी, वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव, वाल्हे, सासवड, हडपसर, पुणे, आळंदी, नगर प्रदक्षिणा होऊन पालखी माऊली मंदिरात विसवणार आहे.

दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान १० जून रोजी देहू येथून होणार आहे.

देहू ते पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थानाची तारखी ठरली,संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed