• Mon. Nov 25th, 2024
    रस्त्यात BMW कार पेटलेली, ड्युटीवर नसूनही अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता, देवदुताचं कौतुक

    पुणे : कुटुंबासोबत कारने जत्रेला जात असताना अग्निशमन दलातील जवानाने वाटेत एका गाडीने पेट घेतल्याचे पाहिले. मात्र ड्युटीवर नसल्याचा विचार न करता देवदुताने आगीच्या दिशेने धाव घेतली. अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यू कंपनीच्या आलिशान गाडीला लागलेली आग जवानाने आटोक्यात आणली. फायर ब्रिगेडचे जवान हर्षद येवले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मंगळवार ११ एप्रिल २०२३ रोजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास उंड्री पिसोळी, धर्मावत पेट्रोल पंपासमोर आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेडकडून कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन व वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.

    दरम्यान, या भागातील रहिवाशी असलेले व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात ड्युटी करणारे फायर ब्रिगेड देवदूतचे जवान हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासह सातारा रस्ता, केंजळ गाव येथे जत्रेसाठी चारचाकी वाहनातून जात होते. यावेळी त्यांना एका वाहनाने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याचे दिसले.

    आपण ड्युटीवर नसूनही कर्तव्यदक्षता दाखवत त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेतली. गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी करुन त्यांनी धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण आणले. ते वापरुन बीएमडब्ल्यू-एक्सवन या पेटलेल्या कारची आग प्राथमिक स्वरुपात आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

    पुण्यात व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग ‘असा’ लागला छडा
    त्याच वेळी तिथे अग्निशमन वाहन पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा करत आग पूर्ण विझवली. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी व कुटुंबियांनी जवान हर्षद येवले व इतर जवानांचेही कौतुक केले.

    साताऱ्यात स्कूल व्हॅनन अचानक घेतला पेट; चालकाने दाखवलं प्रसंगावधान, सर्व विद्यार्थी सुखरुप

    या कामगिरीत देवदूत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहन चालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.

    तुम्ही खूप चांगले होता, पण सॉरी, माझाच जरा…; लॉजवर व्यावसायिकाची बॉडी, जवळ चिठ्ठी सापडली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed