• Mon. Nov 25th, 2024
    काळजी घ्या! राज्यात करोना रुग्णवाढ हजारानजीक; मृत्यूदर सध्या १.८२ टक्के

    मुंबई : राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून चढउतार दिसत आहे. सोमवारी करोना रुग्णांच्या संख्येत घट होऊन राज्यात ३२८ रुग्ण सापडले असताना मंगळवारी ही संख्या थेट ९१९वर पोहोचली. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ४८७५ इतकी झाली आहे. राज्यात मंगळवारी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

    २ एप्रिलपासूनची रुग्णवाढ पाहता मंगळवारी राज्यात सर्वाधिक म्हणजे ९१९ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी ७ एप्रिलला ही संख्या ९२६, ६ एप्रिलला ८०३, ९ एप्रिलला ७८८ इतकी होती. ४ एप्रिल रोजी ७११ नवे रुग्ण आढळले होते. मुंबईत मंगळवारी २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४८७५ उपचाराधीन रुग्ण असून, ठाण्यात ८९६, पुण्यात ७३१, धाराशीवमध्ये १०१, नागपूरमध्ये ४५१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, धाराशीव, नागपूर येथे उपचाराधीन रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या १.८२ टक्के आहे. मंगळवारी राज्यात बरे झालेल्या ७१० रुग्णांना घरी सोडण्यात आले.

    सेक्स करायला नकार दिल्याने मिथ्थूने बँडस्टँडवर मुंबईतील MBBSच्या विद्यार्थिनीला ठार मारलं, पोलिसांचा दावा
    मुंबईतील स्थिती

    बाधित रुग्ण : २४२

    लक्षणेविरहित रुग्णांची संख्या : २१४

    रुग्णालयात दाखल : २८

    ऑक्सिजनवरील रुग्ण : १३

    रुग्णालयामध्ये दाखल : ११०
    चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द, कारण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *