• Sat. Sep 21st, 2024
मुंबईच्या वीजमागणीचा पुन्हा उच्चांक; राज्याची मागणी २४, ५०० मेगावॉटहून अधिक

मुंबई : राज्याच्या वीजमागणीने मंगळवारी मुंबई वगळता २४ हजार ५८४ मेगावॉट हा या मोसमातील नवा उच्चांक गाठला. त्याचवेळी मुंबईच्या मागणीनेही ३६०० मेगावॉटचा टप्पा पार करीत नवा मोसमी उच्चांक गाठला आहे. महावितरणने मागील मंगळवारीच २४ हजार मेगावॉटहून अधिक वीजपुरवठा केला होता, हे विशेष.

मुंबईत निवडक भाग वगळून उर्वरित ठिकाणी तीन कंपन्यांकडून वीज वितरण होते. तर राज्यभरात महावितरणकडून विजेचा पुरवठा ग्राहकांना होतो. महावितरणकडील राज्याच्या या वीज मागणीने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात २३ हजार ९०० मेगावॉटचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर पावसाळी वातावरणामुळे मागणी सातत्याने २२ हजार ८०० ते २३ हजार २०० मेगावॉटदरम्यानच होती. मागील मंगळवारी दुपारी २४ हजार ३८३ मेगावॉटची उच्चांकी मागणी होती. या मंगळवारी दुपारी ३.२० वाजता राज्याच्या वीजमागणीने २४ हजार ५८४ चा उच्चांक गाठला.

चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द, कारण…
महावितरण कंपनी राज्य सरकारी महानिर्मिती, काही खासगी उत्पादक व अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून खरेदी करते. मंगळवारी मागणीने २४ हजार ८५४ मेगावॉटच्या मागणीवेळी महानिर्मिती कंपनीने तब्बल ६८०० मेगावॉटचे औष्णिक वीज उत्पादन केले, हे विशेष. ही वीजनिर्मिती क्षमतेच्या ७५ टक्के होती.

मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर व बेस्ट उपक्रम यांच्याकडून वीज वितरण केले जाते. या तिन्ही कंपन्यांच्या वीजमागणीने मंगळवारी कमाल ३ हजार ६२३ मेगावॉटचा टप्पा गाठला. ही या उन्हाळ्यातील सर्वाधिक वीजमागणी ठरली आहे. यामध्ये सर्वाधिक १७३३ मेगावॉट विजेचे वितरण अदानी इलेक्ट्रिसिटीने केले. टाटा पॉवर व बेस्ट यांची वीज मागणी ९०० मेगावॉटदरम्यान होती.

आधी मुंडण, मग नग्न करून फिरवलं; स्थानिक तरुणांच्या छळामुळे माझा लेक गेला; वडिलांचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed