मुंबई : कर्जत ते खोपोलीदरम्यान आधीच लोकल फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना लोकलसाठी ताटकळत राहावे लागते. त्यात आज, बुधवारपासून तीन दिवस या त्रासात आणखी भर पडणार आहे. कर्जत यार्डमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते खोपोली घाटमार्गादरम्यान तीन दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉक कालावधीत दोन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने १२ ते १४ एप्रिलदरम्यान सकाळी १०.५० ते दुपारी ३.४५ दरम्यान विशेष ब्लॉक घोषित केला आहे.
ब्लॉक कालावधीत दुपारी १.१५ची कर्जत ते खोपोली आणि २.५५ची खोपोली-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल कर्जत स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. कर्जत ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द राहणार असल्याने खोपोलीहून दुपारी १.४८ला सुटणारी सीएसएमटी लोकल कर्जत स्थानकातून चालवण्यात येईल.विजयानंतर मुंबई इंडियन्ससाठी आली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर पाहा घडलं तरी काय…