• Sat. Sep 21st, 2024

सॉरी आई पप्पा, मला माफ करा, LLB ला शिकत असलेल्या धुळ्याच्या भारतीची धक्कादायक एक्झिट

सॉरी आई पप्पा, मला माफ करा, LLB ला शिकत असलेल्या धुळ्याच्या भारतीची धक्कादायक एक्झिट

धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित विद्यार्थीनी धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विद्या भवन लेडीज हॉस्टेल येथे राहत होती.भारती अमृत चौरे (वय वर्ष २३) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या विद्यार्थिनीने दोन महिन्यापूर्वीच हॉस्टेलला प्रवेश घेतला होता. कालच ती पुन्हा हॉस्टेलला आली होती. तिच्या रूमवरील मैत्रीण गावाला गेली होती म्हणून ती कालपासून रूममध्ये एकटीच होती. हीच संधी साधून आज भारती चौरे हिने सकाळच्या सुमारास हॉस्टेलमधील रूमला असलेल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

आज दुपारच्या सुमारास भारती चौरे हिची मैत्रीण तिला बोलवण्यासाठी गेली असता तिने दरवाजा उघडलाच नाही. तिच्या मैत्रिणीला शंका आल्यामुळे तिने खिडकीमधून पाहिले तर भारती चौरे हिने दोरीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने लागलीच होस्टेलमध्ये व्यवस्थापक असलेल्या मॅडमला सगळा प्रकार सांगितला. यावेळी हॉस्टेलमध्ये असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

यानंतर घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हॉस्टेलमध्ये दाखल झाले. त्यांनी रूम तोडून आत मध्ये प्रवेश केला असता भारती चौरे हिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तिने ‘आई पप्पा सॉरी’ अशा आशयाची सुसाईड नोट लिहून जगाचा निरोप घेतला होता. या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे ती खूप डिप्रेशनमध्ये असल्याचं जाणवत होतं. त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भारती चौरेंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed