• Sat. Sep 21st, 2024
विदर्भात यंदा किती पाऊस पडेल, हवामान विभागानं काय सांगितलं, पहिल्या अंदाजात काय म्हटलं?

नागपूर : यंदा नैऋत्य मोसमी पावसात विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मंगळवारी हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज जारी केला. भारतीय हवामान खात्याच्या मते, यावर्षी नैऋत्य मान्सून दरम्यान, वायव्य आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. मात्र, मान्सूनची खरी स्थिती मे महिन्यानंतरच कळेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि पृथ्वी मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्यासह अनेक बडे अधिकारी सहभागी झाले होते. हवामान खात्याने सांगितले की, यावर्षी देशात जून ते सप्टेंबर या महिन्यांत ८३.५ मिली पाऊस पडेल. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ९६ टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे. तो सामान्य पावसाच्या श्रेणीत येतो.

कर्नाटकच्या रणधुमाळीत भाजपच्या माजी उपमख्युमंत्र्यांचं नड्डांना पत्र, निवडणुकीबाबत मोठा निर्णय कळवला

जुनाबाई आणि डागोबाची पिल्लांसह मस्ती कॅमेरात कैद; तलावाकाठी बछड्यांवर प्रेम करणारी वाघीण

विदर्भात कमी पाऊस होईल असा अंदाज

हवामान खात्याने देशात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. परंतु महाराष्ट्र, मध्य भारत विशेषतः विदर्भात मान्सूनच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया सारख्या काही जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस पडू शकतो. त्याच विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९०-९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक एम.एल. साहू यांनी स्पष्ट केले की, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीस मान्सूनबाबत नवीन अंदाज जारी केला जाईल. त्यानंतरच मान्सूनची खरी स्थिती कळेल.

Monsoon 2023: मोठी बातमी,भारतात मान्सूनचा पाऊस कसा असणार? हवामान विभागाकडून गुड न्यूज, जाणून घ्या सविस्तर

अल निनोचा प्रभाव पावसाळ्यात दिसून येईल

अल निनोचा प्रभाव यंदाही दिसणार आहे, म्हणजेच दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात अल निनोची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात जाणवू शकतो, तथापि, याचा अर्थ पाऊस कमी होईल असे नाही. गेल्या काही वर्षांत अल निनोच्या काळातही सामान्य आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

चंद्रपूरकरांना उन्हाचे चटके सुरु, २०२३ मधील सर्वाधिक तापमानाची नोंद, उष्ण शहर ओळख का बनली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed