मागील वर्षी एप्रिल महिना तापदायक…
सन २०२२ चा एप्रिल महिना फारच तापदायक ठरला होता.एप्रिल महिन्यातील तापमान ४३.६, आणि ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. विशेष म्हणजे मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच तापमान वाढ सुरु झाली होती. घरातून बाहेर निघणे कठीण झालं होतं.
तापमान वाढीची ही आहेत कारणे…
दरवर्षी चंद्रपूरचे तापमान का वाढतंय? याला अनेक करणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे शहरातील प्रदूषण होय. शहराचं औद्योगीकरण झालं अनेक उद्योग येथे उभे झालेत. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला हे खरे मात्र त्या सोबतच प्रदूषणामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाच्या अतिशय गंभीर विषय असला तरी याकडे कुणी फारसं गंभीरतेने बघत नाही ही मोठी शोकांतिका आहे.
लाल मिरचीने सुखावलं; १० वर्षांतील सर्वाधिक भाव, व्यापाऱ्यांनी थेट गाठली शेतकऱ्यांची घरं
इंग्रजंही झाले होते हैराण…
विदर्भ हा उष्ण कटींबधीय प्रदेश आहे. दरवर्षी इथं उन्हाळा फारच तापतो. येथील तापमानाचा फटका इंग्रजांनाही बसला होता. इंग्रजांच्या काळात येथील तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला होता. त्यामुळं इंग्रजांचे हाल हाल झाले होते.
विदर्भ हा मध्य भारतात येतो.सोबतच इथं झालेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, प्रदूषण तापमान वाढीला कारणीभूत असल्याचं अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं. मागील वर्षी मार्च महिना चंद्रपूरसाठी तापदायक ठरला होता. तापमानाने चाळीशी पार केली होती. मात्र, यावर्षी मार्च महिना आणि एप्रिल महिन्यात महिन्याचा पहिल्या आठवडयात जिल्हात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळं मार्च महिना तापमानाच्या बाबतीत थंड ठरला.