पुणे : पुढील पाच दिवस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आजपासून ११ एप्रिल रोजी मंगळवारी सुरू होणार असलेला अवकाळी पाऊस पुढच्या ५ दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची असल्याचा इशारा आहे. पुढच्या ५ ते ६ दिवसांपासून राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्याला अवकाळीचा इशारा दिला आहे.आजपासून पुढील ५ दिवस अवकाळीचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी करावी अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या भागांमध्ये १३ आणि १५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जुलै-ऑगस्टमध्ये काय घडणार; ‘स्कायमेट’कडून मान्सूनचा अंदाज जाहीर
महाराष्ट्रमध्ये मार्च महिन्यामध्ये २८ जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता. त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना आता पुन्हा एकदा बळीराजा चिंतेत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी नुकसान झालं तर शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.OMG! १४ दिवसांचं बाळ गरोदर, श्वास घेता येत नाही म्हणून डॉक्टरांकडे नेलं; स्कॅन करताच चक्रावले…