या पोस्टमध्ये आत्महत्या करणार्या व्यक्तीने असं म्हटलं आहे की, “प्रिय मित्र आणि नातेवाईक तुम्हाला सांगताना माझा कंठ अतिशय दाटून येत आहे. कारण मी तुम्हाला नंतर कधीही भेटणार नाही. माझ्याकडे माझ्या काही मित्रांचे पैसे आहेत. माझी प्रामाणिक इच्छा होती की मी आज ना उद्या तुमचे पैसे देईल. पण माझ्यावर असा काही प्रसंग आला आहे, की मला नाईलाजाने आत्महत्या करावी लागत आहे. कारण माझ्यावर असा काही प्रसंग आला की मी कोणालाही तो सांगू शकत नाही.
“कारण माझे एक स्वप्न होते की माझं कुटुंब ग्रॅज्युएट आहे. त्यामुळे मी मुलांचे उच्च शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. कधी मला अडचण आली तरी मी दुसऱ्याकडे हात पाय पसरले आणि त्यांचे शिक्षण केले. पण त्याचे फळ म्हणून मला आज आत्महत्या करावी लागत आहे. कारण मी सगळं काही करू शकलो पण मी माझ्या मुलांना संस्कार देऊ शकलो नाही. त्यामुळे मी आज गळफास घेत आहे. कोर्ट कधी शिक्षा देईल नाही देईल पण मी असा निर्णय घेतला की माझ्या गुन्ह्यांची शिक्षा मलाच मिळायला पाहिजे. कारण मी माझ्या मुलांचे शिक्षण करून फार मोठी चूक केलेली आहे. काही माझे हितचिंतक असतील माझे नातेवाईक असतील त्यांना माझा हा निर्णय पटणार नाही. पण मित्रहो मला माफ करा हा निर्णय माझाच आहे आणि तुम्ही मला खरंच माफ करणार असं मला वाटत नाही. तर कृपया मला माफ करावं एवढीच हात जोडून विनंती”
अशी पोस्ट टाकत त्यांनी आत्महत्या केली. तात्काळ या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना कळवली असता पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तात्काळ ही माहिती सायबर क्राईमला दिली. त्यांनी सांगितले की, दत्तात्रय सोरमारे यांचे लोकेशन हे दावरवाडी शिवाराकडे आहे. त्यानंतर पोलीस गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना तिथे सोरमारे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मध्यरात्री चोरमारे यांचा मृतदेह खाली उतरून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उत्तरीय तपासण्यासाठी पाठवण्यात आला आहे.