• Mon. Nov 25th, 2024
    कॉल सेंटरच्या पार्टीवरून परतताना WEH वर अपघात, भरधाव वेगातील गाडीने प्रियाच्या स्कूटरला उडवलं

    मुंबई: मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western express highway) झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रिया कनोजिया असे या तरुणीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात ८ एप्रिल म्हणजे शनिवारी रात्री ९ वाजात प्रिया तिच्या घरातून बाहेर पडली होती. मी ऑफिसच्या पार्टीला जाते, असे तिने आईला सांगितले होते. रविवारी पहाटे पार्टीवरून परतत असताना परत येत असताना प्रिया स्कुटर चालवत होती. तिच्या पाठीमागे तिचा ऑफिसमधील एक मैत्रीण बसली होता. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर दहिसर परिसरात असताना त्यांच्या स्कुटीचा अपघात झाला. यामध्ये प्रियाचा जागीच मृत्यू झाला तर तिचा सहकारी जखमी झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत प्रियाच्या मैत्रिणीने अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र, प्रियाच्या स्कुटीला रस्त्यावरुन जाणाऱ्या एखाद्या वाहनाची धडक बसली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणात अज्ञात वाहनचालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.

    प्रिया कनोजिया ही तिच्या पालकांसोबत बोरिवलीमध्ये राहत होती. प्रियाचे वडील हे रिक्षाचालक आहेत, तर तिचा भाऊ बीपीओमध्ये नोकरीला आहे. प्रियाने पार्टीला जाणार असल्याचे सांगितल्याने तिला घरी यायला उशीर होईल, असे कुटुंबीयांनी गृहित धरले असावे. प्रिया शनिवारी रात्रभर घरी नव्हती. रविवारी सकाळी प्रियाची मैत्रीण विभा हिने तिच्या आईला फोन केला. त्यावेळी विभाने प्रियाचा दहिसरमध्ये अपघात झाल्याचे सांगितले. यानंतर विभा आणि तिचा नवरा विजय हे दोघे अपघात झाला त्याठिकाणी जाण्यासाठी निघाले. रस्त्यामध्ये त्यांना प्रियासोबत असलेल्या मैत्रिणीने पुन्हा फोन केला. त्याने प्रियाला कांदिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. विभा आणि तिचा नवरा सकाळी साडेनऊच्या सुमारास रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी प्रिया कनोजिया हिला मृत घोषित केले.

    अपघातावेळी प्रियासोबत असलेली तिचा मैत्रीण बेशुद्ध होती. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांनी हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हे प्रकरण हिट अँड रनचे असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ज्याठिकाणी प्रियाच्या स्कुटरचा अपघात झाला त्या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तसेच अपघातस्थळी कोणताही साक्षीदारही नव्हता. परंतु, पोलिसांच्या अंदाजानुसार, अपघातावेळी प्रिया स्कुटर चालवत असावी आणि तिची मैत्रीण पाठीमागे बसलेली असावी. ज्या वाहनचालकाने प्रियाच्या स्कुटरला धडक दिली होती, तो दोघींना जखमी अवस्थेत सोडून पळून गेला. याप्रकरणात पोलिसांनी कलम ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *