अजितदादांच्या संपर्कात
“इथून मी पालघरला जात असेन, तर इथले लोक मलाही नॉट रिचेबलच म्हणणार ना?” असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी पत्रकारांना केला. नॉट रिचेबल म्हणजे नेमकं काय? मला तर माहिती नाही तुम्ही हे कशाच्या आधारावर बोलताय, असं म्हणत पवारांनी आपण या प्रकरणापासून अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार डळमळण्याच्या शक्यतेवरुन माध्यमांनी पवारांना विचारलं असता, ‘होऊन जाईल, आम्ही पण वाट बघतोय त्या निर्णयाची. तो निर्णय काहीतरी वेगळा आला तर चांगली गोष्ट आहे’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
काही पत्रकारांनी त्यानंतर पुन्हा अजितदादा नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारला. त्यावर ‘उद्या तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळे नॉट रिचेबल, पण आहे ती घरात आहे, तुमच्या समोर नाही, पण आहे ना’ असं शांतपणे उत्तर दिलं.
रोहित पवारांवरचा प्रश्न २ वेळा टाळला, पत्रकाराला झापलं; पण अखेर अजितदादांना आरोपावर उत्तर द्यावंच लागलं
अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार काल ते बारामती होस्टेल येथे सकाळी नऊ वाजताच दाखल झाले होते. त्यांनी दुपारपर्यंत कात्रज दूध संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला.
जेवण झाल्यानंतर ते केशवनगर येथील त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवानाही झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नियोजित कार्यक्रमाच्या अलीकडे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. त्यांच्या कारमध्ये ते, त्यांचे स्वीय सहायक आणि चालक असे तिघेच होते. त्यांची कार थांबली, त्या ठिकाणी त्यांनी नारळपाणीही घेतले. फोनवर बोलत असताना त्यांनी अचानक आपले कार्यक्रम रद्द केले आणि ते पोलिस बंदोबस्त सोडून आपल्या खासगी दौऱ्यावर निघून गेले.