• Mon. Nov 25th, 2024
    साईंच्या काकड आरतीला पोहोचणं सहज शक्य होणार, वंदे भारत ट्रेननंतर शिर्डीतील भाविकांना आणखी एक गिफ्ट

    मोबीन खान – शिर्डी
    शिर्डी :
    सर्व साई भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शिर्डी विमानतळावर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नाईट लँडिंगचा प्रश्न आता सुटला असून आज ८ एप्रिलपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू होणार आहे. समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत ट्रेनने शिर्डीला जोडल्यानंतर मोदी सरकारने आता शिर्डीला तिसरी भेट दिली आहे. शिर्डीत आता साईभक्तांसाठी नाईट लँडिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देश भरातून शिर्डीत दाखल होणाऱ्या लाखो साईभक्तांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे. ‘सबका मालीक एक’ आणि ‘श्रद्धा सबुरी’चा संदेश देणारे साईबाबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने शिर्डीत दररोज हजारो साईभक्त दर्शनासाठी येत असतात. १ ऑक्टोबर २०१७ ला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी विमानतळाला मोठा प्रतिसाद मिळत असून विमान प्रवास करणाऱ्या साईभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून साईबाबांच्या दर्शनासाठी आता रात्री देखील विमानाने पोहचणे शक्य होणार आहे. शिर्डी विमानतळावर (८ एप्रिल) पासून नाईट लँडिंग सुरू होत असून दिल्लीहून इंडिगो कंपनीचे पहिले विमान रात्री आठ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर उतरणार आहे.

    बजरंगबली की जय! हनुमान जयंतीला साक्षात मारूतीरायाचं दर्शन, अख्खी वानरसेना बसली पंगतीला; पाहा VIDEO
    दरम्यान, शिर्डीच्या साई मंदिरात पहाटे होणाऱ्या काकड आरतीला साई भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. मात्र, अनेक भाविकांना वेळेवर पोहचताच येत नाही. शिवाय काकड आरतीला पोहोचायचं असल्यावर एक दिवस आधीच शिर्डीत यावं लागतं. मात्र, नाईट लँडिंगमुळे आता काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या भक्तांना त्याच पहाटे शिर्डीत पोहोचता येणार आहे. आतापर्यंत हैदराबाद, चैन्नई, दिल्लीसह बंगलोर इथून येणाऱ्या विमानांना मोठा प्रतिसाद मिळत असून नाईट लँडिंग सुविधा सुरु झाल्यावर अनेक नवीन विमान सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. नाईट लँडिंग सुविधेमुळे परिसरातील विकासाला अधिक चालना मिळणार हे मात्र नक्की.

    Weather Alert: राज्यात ४८ तासांत मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

    भाविकांच्या संख्येत वाढ होणार….

    नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त झाल्यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा असून या निर्णयामुळे भाविकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणं अपेक्षित आहे. तसंच, स्थानिक अर्थकारणाला गती मिळणार आहे.

    भिकारी झाला, रस्त्यावर झोपला अन् एका रात्रीत १८ लाखांचा झोल, पुण्यातली घटना वाचून थक्क व्हाल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *