• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यात व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग असा लागला छडा

    जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे हा प्रकार घडला आहे.किशोर तांबे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते. या प्रकरणात पोलिसांनी पांडुरंग जिजाबा तांबे (वय ३९ वर्ष) व महेश गोरकनाथ कसाळ (वय ३० वर्ष) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत किशोर तांबे हरवल्याची तक्रार चुलत भाऊ संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिसात दिली होती.

    याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी किशोर तांबे यांना दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले. दारू पिताना आरोपी आणि तांबे यांच्यात वादावादीस सुरुवात झाली. मुरूम व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे आमची बदनामी करतो का? या गोष्टीचा राग आरोपींच्या मनात घर करून होता. त्यातूनच आरोपी पांडुरंग तांबे याने मित्राच्या मदतीने किशोर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यातच तांबे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुरावे गायब करण्यासाठी आरोपींनी तो मृतदेह पोत्यात भरला आणि तो पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात दगड भरले. हा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.

    साताऱ्यातील अपघाताने पुरंदर सुन्न, एकुलती एक लेकरं गेली, ग्रामदैवताची यात्राही थांबली
    पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परिसराची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना मृतदेह तिथून जवळच असलेल्या विहिरीत आढळला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनीच खून केल्याचे यात समोर आले आहे.

    बहिणीसोबत अफेअर असल्याचं समजलं; भावाने बॉयफ्रेंडला मागे पळून पळून मारलं

    किशोर तांबे हे व्यवसायाबरोबरच सामाजिक कामात देखील आघाडीवर असायचे. त्यांच्या जाण्याने बेल्हे व तांबेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

    नदीपात्रात तरंगणारी बॉडी, हातावर ‘सुभाष’ नाव; ओळख पटवण्यासाठी आलेलं कुटुंब म्हणतं, हे तर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed