महाड, रायगड : मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचा समावेश आहे. रिवान दर्शन तावडे (वय वर्षे ३), रित्या दर्शन तावडे ( वय ६ महिने) आणि वैशाली विजय तावडे (वय वर्ष ७२) अशी मृतांची नाव आहे. आणि हे सर्व बोरीवलीचे राहणारे होते. तावडे कुटुंबीय आपल्या कारमधून बोरीवली येथून देवगडला कोकणात जात होते. यावेळी माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत हा दुर्दैवी अपघात झाला. दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताचा अधिक तपास माणगाव पोलीस करीत आहेत.
या अपघातात मृत झालेल्या व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडा येथील होत्या. दरम्यान, या अपघातातील दर्शन विजय तावडे ३६, श्वेता दर्शन तावडे ३० (दोन्ही राहणार देवीपाडा बोरिवली, मुंबई) या दोन जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथे केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्काळ मदतकार्य सुरू केले. या अपघात प्रकरणी जखमी झालेले दर्शन विजय तावडे (वय ३६ राहणार बोरिवली) यांच्यावरती माणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघातांचे सत्र सुरूच आहे. माणगाव तालुक्यात कशेणे हद्दीत झालेल्या भीषण अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड परिसरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. याच महामार्गावरती या परिसरात महिनाभरापूर्वी गुहागर तालुक्यातील हेदवी येथील तब्बल नऊ जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.