बीड: माजलगाव तालुक्यात असलेलं छत्र बोरगाव या ठिकाणी यात्रेच्या आडून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून कळाली होती. याच ठिकाणी धाड टाकण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होऊन जात असतानाच अचानक जुगाऱ्यांनी या पोलीस यंत्रणेवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत अनेक कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. यात ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चैत्र महिना म्हटलं की जिल्ह्याभरात अनेक गावात यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यादरम्यान माजलगाव तालुक्यातील छत्र बोरगाव या ठिकाणी देखील देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र यात्रेच्या आडून सोरट नावाचा जुगार या ठिकाणी काही लोक खेळत असल्याचं गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली. यासोबतच जुगाराचे अनेक प्रकार याठिकाणी चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या यात्रेच्या ठिकाणी एक पथक नेमलं आणि ते पथक या यात्रेच्या ठिकाणी रवाना झाला.
या ठिकाणी गेल्यानंतर या जुगार खेळणाऱ्यांमध्ये आणि पोलिसात पकडापकडीचा खेळ सुरू होताच वाद निर्माण झाला आणि या वादात अचानक पोलीस प्रशासनावर दगडफेक झाली. यात अनेक पोलीस प्रशासनाचे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून यात या टीमचे नेतृत्व करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकर यांनाही जबर मार लागला. या घटनेनंतर जवळपास काही तासांसाठी या यात्रेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांच्या फिर्यादीवरून २५ ते ३० जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चक्क पोलिसांवरच हे जुगारी दगडफेक करत असतील, पोलिसांना जुमानत नसतील आणि सर्वसामान्य जनतेचा जुगाराच्या माध्यमातून पैसा लुटत असतील तर हे कुठेतरी थांबणे गरजेचे असल्याचे नागरिक म्हणत आहे. या जुगारांना आधी देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र तरी देखील यात्रेच्या आडून सर्रास सोरट नावाचा जुगार, अवैध दारूविक्री, इतर जुगारी धंदे या यात्रेच्या दरम्यान चालू होते. मात्र पोलिसांनी छापा टाकल्यानंतरही त्यांनाही मारहाण करणारी हे जुगारी नेमके कोणाच्या जीवावर उड्या मारतात हा देखील प्रश्न नागरिकांनी उभा केला आहे.