म.टा. प्रतिनिधी, मुंबईः बेस्ट उपक्रमाकडून मुंबईकरांना सुपरसेव्हर योजनेंतर्गंत दिले जाणाऱ्या विद्यार्थी पास, अमर्यादित पास आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरात कपात करण्यात आली आहे. उद्या शुक्रवारपासून ही नवीन योजना लागू होणार आहे. यामुळं दैनदिन तिकिटे खरेदीच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत बचत होणार असून, ही योजना वातानुकूलित आणि विनावातानुकूलित अशा सर्व सेवांसाठी लागू असेल. सहा रुपये भाडे टप्पा असलेली ही योजना आता स्वस्त झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. या योजनेंतर्गंत खासगी शाळा आणि कॉलेज विद्यार्थ्यांसाठी ३० दिवसांच्या साध्या पासद्वारे २०० रुपयांत ६० फेऱ्यांची सवलत मिळेल. जेष्ठ नागरिकांना २८ दिवस आणि त्याहून अधिक कालावधीच्या सर्व सुपरसेव्हर योजनांवर ५० रुपयांची सवलत मिळेल.
मुंबईतून चिंता वाढवणारी बातमी, ‘या’ उच्चभ्रू भागात रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक, असे आहे चित्र
बेस्टला अधिकाधिक प्रवासी मिळावेत यासाठी अमर्यादित बसपासही सुपरसेव्हर योजनेंतर्गंत दिला जातो. यामध्ये वातानुकूलित बसपाससाठी अमर्यादित फेरीची किंमत एका दिवसाच्या पाससाठी ६० रुपयांवरुन ५० रुपये आणि ३० दिवसांच्या पाससाठी १ हजार २५० रुपयांवरुन ७५० रुपये करण्यात आली आहे. ही प्रवासी योजना बेस्ट चलो अॅप आणि बेस्ट चलो कार्डवर खरेदी करु शकतात.हात-पाय धुण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरले, इतक्यात पाय घसरला; दोन मित्रांचा दुर्दैवी अंत
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं आकर्षक स्वरुप, गाभाऱ्यात २१ हजार सूर्यफुलांची आरास