• Mon. Nov 25th, 2024
    हिंगोलीच्या वसमतमध्ये घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, अल्पवयीन मुलीकडे यायचे गिऱ्हाइक

    हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील श्रीनगर भागातील एका घरावर वसमत पोलिसांनी छापा मारला. तेथे एका अल्पवयीन मुलीस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून घरात वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचेही समोर आले. याप्रकरणी एका महिलेससह लोकांना ताब्यात घेऊन पॉक्सो व अन्य कलमेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    वसमत शहरातील श्रीनगर कॉलनीतील एका महिलेच्या घरी कुकर्म चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना लागली. वसमत शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा मारला. या छाप्यात एका अल्पवयीन मुलीस तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची घटना समोर आली.

    पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवताच…

    एका अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करण्यासाठी आलेला एक आरोपीही आढळून आला. सदर महिलेने आपल्या घरात कुकर्म करण्यासाठी जागा देऊन वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचेही या छाप्यात समोर आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून वैभव अवचित चौरे (रा. पिंपळा चौरे,तालुका वसमत) व श्रीनगर भागातील रहिवासी महिला अशा दोघांविरोधात पॉक्स आणि पीटा एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अवैधरीत्या भारतात आणलं, मग सांगलीत नेलं, २२ वर्षीय तरुणीकडून बळजबरी वेश्या व्यवसाय

    या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत. यामधील अल्पवयीन मुलीला बालसुधार गृहात पाठवण्याची प्रक्रिया उशिरा सुरू होती.सदर प्रकरणामुळे वसमत शहरात मात्र एकच खळबळ उडाली.यासारखी अशी काही प्रकरणे आहेत का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

    आरोपींमध्ये माजी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

    श्रीनगर कॉलनी मध्ये एका अल्पवयीन मुलीला कुकर्म करण्यासाठी बोलावून व्यवसाय चालविला जात असताना गुन्हा दाखल झाला आहे. ज्यामध्ये आरोपींमध्ये एका माजी महिला पोलीस कर्मचारी यांचा समावेश असल्याने यामध्ये आणखीनच पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    अल्पवयीन मुलीचा ५० हजारात सौदा; मनसे म्हणाली, ‘जिथे गरज पडेल तिथे दांडा नक्की बाहेर काढू!’

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed