लोणावळा : नियंत्रण सुटलेली कार ट्रकवर आदळल्याने दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला, तर त्याची बहीण आणि मुलगा जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर असणाऱ्या माळवलीजवळ बोरज गावात भीषण अपघात झाला. मंगळवारी पहाटे ३ वाजता हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये मुंबई पोलिसातील हवालदार असल्याची माहिती समोर आली आहे.श्रीकांत मुरलीधर सावंत (वय ४८ वर्ष) आणि त्यांचा चुलत भाऊ जनार्दन वामन सावंत (वय ६१ वर्ष) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. श्रीकांत यांची बहीण अश्विनी राणे (वय ५४ वर्ष, रा. भाईंदर) आणि मुलगा आर्य (वय २० वर्ष) जखमी झाले. अश्विनी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सावंत आणि राणे कुटुंब हे मूळचे सिंधुदुर्गातील कणकवलीचे आहेत. कणकवलीत गावच्या जत्रेत सहभागी झाल्यानंतर कोल्हापूर आणि पुणे मार्गे ते मुंबईला परतत होते. तेव्हा पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मळवली येथे जाताना हा अपघात झाला आहे.

भरधाव कारने समोरील मालवाहू ट्रकला भीषण धडक दिली. यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर आरोप
या अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. कार आणि मालवाहू ट्रक एकाच लेनवर असताना हा अपघात झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राणे आणि सावंत कुटुंब हे सिंधुदुर्ग येथील आहे. ते पुण्यातून मुंबईतील मुलुंड येथे जात होते. तेव्हा प्रवाशांपैकी दोघांवर काळाने घाला घातला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.