• Mon. Nov 25th, 2024
    दादर स्थानकात पोलिसांनी त्या मुक्या महिलेच्या खाणाखुणा ओळखल्या, झटक्यात चक्रं फिरली अन्….

    डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचच्या बाकड्यावर सोमवारी संध्याकाळी सात वाजता एका महिलेची पर्स पडली होती. एका जागरूक प्रवाशाच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्याने रेल्वे पोलिस आणि स्थानक व्यवस्थापक यांना ही माहिती दिली. ही पर्स एका मूक आणि अंध महिलेची आणि ती दादर रेल्वे स्थानकात असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. या मुक्या दाम्प्त्याने डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन स्वत:ची ओळख पटवून पर्स आणि त्यामधील दोन मोबाईल ताब्यात घेतले.

    डमी उमेदवाराचा प्लॅन ऑल सेट, पण एक चूक नडली; ठाणे पोलिसांनी चतुराईने पकडलंच, काय घडलं?

    डोंबिवलीकर असलेले पत्रकार श्रीकांत खुपेरकर सोमवारी उल्हासनगर येथे कुटुंबासह गेले होते. तेथून लोकलने परत येत असताना ते डोंबिवली स्थानकात फलाट क्रमांक पाचवर संध्याकाळी ७.२१ वाजता उतरले. लोकल निघून गेल्यावर आणि फलाटावर गर्दी नसताना त्यांना फलाट क्रमांक पाचवर एका बाकड्यावर एका महिलेची पर्स पडली असल्याची दिसली. त्यांनी उपस्थित महिला, पुरूषांना पर्स कोणाची म्हणून विचारणा केली. कोणी पर्सचा ताबा घेण्यास पुढे आले नाही. खुपेरकर यांनी ही माहिती सहाय्यक रेल्वे स्थानक व्यवस्थापक संत लाल, रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदार अनिता वर्मा, हवालदार व्ही. पी. भैवर, लोहमार्ग पोलीस जयदीप पवार, पॉईंटमन दत्तू गोवर्धने यांना दिली. त्यानंतर ही पर्स साहाय्यक स्थानक व्यवस्थापक संत लाल यांच्या ताब्यात देण्यात आली. लाल यांनी पर्स तपासली तर त्यात दोन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र होते.

    ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा, स्थानकात प्रवाशांना मिळतील या सुविधा

    पोलिसांनी पर्स कोणाची म्हणून शोध सुरू केला असतानाच दादर रेल्वे पोलीस ठाण्यातून डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात फोन आला की डोंबिवलीतील एका मूक आणि अंध महिलेची पर्स डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर विसरली आहे. तिच्या सोबत तिचा मूक पती असून हे दाम्पत्य अहमदाबादला चालले आहेत. मुकी महिला दादर पोलिसांना पर्स हरविल्याची माहिती खुणा करुन देत होती. त्यांना काही वेळ नक्की काय झाले आहे हे कळत नव्हते. अखेर पोलिसांनी तक्रारदार महिला दीपाली झेंडे यांच्याकडून खुणांच्या साह्याने सगळी माहिती घेतली. महिलेची पर्स हरविल्याची माहिती पोलिसांना समजली. डोंबिवलीचे सहाय्यक स्थानक व्यवस्थापक लाल यांनी महिला आणि तिच्या पतीने डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन पर्सचा ताबा घ्यावा. अन्य कोणाच्याही ताब्यात ही पर्स दिली जाणार नाही, असे सांगितले. मूक महिला झेंडे पतीसह रात्री नऊ वाजताच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन सहाय्यक व्यवस्थापक लाल आणि रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत पर्सचा ताबा घेतला. पर्स आणि त्यामधील ऐवज मिळाल्यामुळे झेंडे दाम्पत्याने जागरुक प्रवासी खुपेरकर यांचेही कौतुक केले.

    ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर आरोप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *