Mumbai-Goa Highway Cost Increased : मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या आणि कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला दहा वर्षे उलटूनही पूर्णत्व आलेले नाही. कामाचा वेग मंदावलेला असतानाच महामार्गाच्या चौपदरीकरणाचा खर्च ११ हजार ४०९ कोटी रुपयांवरून तब्बल १६ हजार ९०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एवढी मोठी खर्चवाढ होऊनही महामार्गाचे काम अपूर्णच असल्याने कोकणवासीयांचा कोंडीयुक्त आणि त्रासदायक प्रवास सुरूच आहे.
मुंबई गोवा महामार्ग खर्च वाढला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मंजूर झालेला खर्च तब्बल ५,५०० कोटी रुपयांनी वाढल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन’चे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही आकडेवारी समोर आली. ३५५ किमीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी असलेल्या १० पॅकेजचा मूळ मंजूर खर्च ११,४०९.१४ कोटी रुपये होता. तो आता १६,९०९.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच खर्चात तब्बल ४८ टक्के वाढ झाली आहे.
केंद्राची मंजुरी मिळून १७ वर्षे उलटली
मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या चौपदरीकरणाला केंद्राची मंजुरी मिळून १७ वर्षे उलटली आहेत. मात्र, प्रकल्पाचा मोठा भाग अद्याप पूर्ण झालेला नाही. मिळालेल्या माहितीच्या आकडेवारीनुसार, चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट-आरावली या पॅकेजच्या खर्चात सर्वाधिक वाढ झाली आहे. या पॅकेजसाठी सुरुवातीला ९८३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
Maharashtra Weather : शेतकऱ्यांनो काळजी करु नका! महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, मेघराजा बरसणार, हवामान विभागाचा ताजा अन् दिलासादायक अंदाज
कशेडी बोगद्यात काळोखाचा धोका
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी ठरलेल्या बोगद्यातच सध्या ‘काळोख आणि कोंदटपणा’ अनुभवण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या बोगद्यातील प्रकाशयोजना आणि व्हेंटिलेशन व्यवस्था विजेच्या लपंडावामुळे वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कशेडी घाटातील धोकादायक वळणे टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद व्हावा, यासाठी दोन समांतर बोगदे बांधण्यात आले आहेत. मात्र, या बोगद्यांमधील अनेक दिवे बंद असल्याचे दिसून येते. छतावरून झिरपणाऱ्या पाण्यामुळे रस्ता ओलसर असताना केवळ वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशातच प्रवास करावा लागत आहे.
यंत्रणेत वारंवार बिघाड
महावितरणचा नियमित वीजपुरवठा सुरू होण्यापूर्वी पर्यायी विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने फ्लडलाइट्स आणि व्हेंटिलेशन यंत्रणा बंद पडत असल्याच्या तक्रारी आहेत. बोगद्याबाहेरील प्रवेशद्वारांपासून सुमारे अर्धा किलोमीटर परिसरातील बहुतांश पथदिवेही बंद आहेत. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सवानंतर कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार असल्याने त्यापूर्वी प्रकाशयोजना व वायुविजन व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा