Tirupati Laddu : तिरुपती लाडू प्रसादाच्या तुपात भेसळ, ‘सुकृती फूड्स’च्या कैलासचंद मंगलांना ईडीची अटक, गायीच्या तुपाच्या नावे पामतेल वापरल्याचा आरोप
तिरुपती लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ केल्याच्या आरोपानंतर ‘सुकृती फूड्स’चे प्रवर्तक कैलास चंद मंगला यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक केली आहे. तपास यंत्रणेने सांगितले की, तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला ‘अगमार्क स्पेशल ग्रेड काऊ घी’ (गायीचे तूप) म्हणून पुरवलेले तूप हे रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पामोलिन आणि विविध रसायनांचा वापर करुन तयार करण्यात आले होते.