• Mon. Nov 25th, 2024

    वीर सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, आम्ही आधी जे बोललो ते हिंदू महासभेसाठी होते- शरद पवार

    वीर सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, आम्ही आधी जे बोललो ते हिंदू महासभेसाठी होते- शरद पवार

    नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत वक्तव्य केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. आता या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नाही. राहुल यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘सावरकर हा देशातील मुद्दा नाही. यासोबतच त्यांच्याविरोधात यापूर्वी बोललेल्या गोष्टी वैयक्तिक नसून हिंदू महासभेसाठी होत्या’, असेही शरद पवार म्हणाले.शरद पवार हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात दाखल होताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सावरकरांबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘एकदा आम्ही २० राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बसलो होतो. त्या चर्चेत देशापुढील प्रमुख प्रश्न कोणते? हा विषय होता. त्या बैठकीत मी म्हणालो, की आज ज्यांची देशावर सत्ता आहेत, त्यांचा विचार करण्याची गरज आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आज सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही. आपण सावरकरांच्या विरोधात काही गोष्टी बोललो होतो, ही जुनी गोष्ट आहे. पण ती वैयक्तिक नव्हती, हिंदू महासभेबद्दल होती’, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
    देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, ‘मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहीन, पण…’
    ‘सावरकरांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही’

    ‘दुसरी बाजू अशी आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या बलिदानाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. ३० वर्षांपूर्वी मी संसदेत म्हणालो होतो, त्याची इथे पुनरावृत्ती करतो. सावरकरजींबद्दल एक गोष्ट आम्हाला खूप आवडते, ती म्हणजे त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन. सावरकरजींनी अशा अनेक गोष्टी जाहीरपणे केल्या ज्यांचा सामाजिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन होता’, असे शरद पवार म्हणाले. ‘सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी रत्नागिरीत घर बांधले. घरासमोर एक छोटेसे मंदिर बांधले होते. त्यांनी वाल्मिकी समाजाच्या माणसाला मंदिरात पूजा करण्यासाठी बोलावले. मला वाटते की ही एक प्रगतीशील गोष्ट आहे’, असे शरद पवार यांनी सांगितले.

    तरुणाची दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, तरी सरकार शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

    ‘सावरकरांचा विचार पुरोगामी आहे’

    ‘दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की असे अनेक मुद्दा होते जसे की गाय. गाय ही योग्य प्राणी आहे, ती उपयुक्त असेल तर त्याचा फायदा घ्या आणि उपयोगी नसेल तर इतर गोष्टींसाठी वापरा. सावरकरांनी सांगितलेल्या अशा अनेक गोष्टी कुठेतरी पुरोगामी होत्या. सावरकरांची ही बाजू पाहावी, असे मी त्या सभेत म्हटले होते. आज सावरकर नाहीत, जे नाहीत त्यांच्याबद्दल कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची गरज नाही, देशासमोरील जे प्रश्न आहेत, त्यामध्ये सावरकर हा मुद्दा नाही’, असे शरद पवार म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed