• Mon. Nov 25th, 2024

    शिंदेंच्या शिलेदाराच्या मनात नक्की काय ? पक्का शिवसैनिक म्हणत थेट संजय राऊतांची स्तुती

    शिंदेंच्या शिलेदाराच्या मनात नक्की काय ? पक्का शिवसैनिक म्हणत थेट संजय राऊतांची स्तुती

    पुणे : खासदार संजय राऊत यांना पंजाब, हरियाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल तळेकर (रा. वडगाव शेरी) असे संशयित आरोपीचे नाव असून, पुणे पोलिसांनी त्यास पुढील तपासाकरिता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. संजय राऊतांना आलेल्या धमकीप्रकणी आता शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मात्र सकाळी हा केवळ राजकीय स्टंट म्हणणाऱ्या शिवतारे यांनी संध्याकाळी संजय राऊत यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

    ‘संजय राऊत हे महाराष्ट्रसाठी महत्वाचे नेते असून ते पक्के शिवसैनिक आहेत. त्यांच्यासारखा माणूस असल्या धमक्यांना भीक घालणार नाही.’ असं म्हणत विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांची स्तुती केली आहे. नेहमीच संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या विजय शिवतारे यांनी थेट राऊतांची स्तुतीच केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे.

    आई-बाप-भाऊ जीवावर उठले, मुलाला झोपेतच संपवलं, पोलिसांसमोर बनाव, पर कानून के हात बडे लंबे होते हैं…!

    संजय राऊत यांना अधिकृत त्यांच्या एसएमएसवर धमकी आलेली आहे. मी आपल्याला सांगतो मी आणि संजय राऊत ७ वर्ष प्रवक्ता म्हणून शिवसेनेची एकत्र बाजू मांडत होतो. संजय राऊत हे पक्का शिवसैनिक आहेत. त्यांच्यासारखा माणूस असल्या धमक्यांना भीक घालणार नाही. बिष्णोई असो किंवा आणखी कोणाच्या नावाने त्यांना फरक पडणार नाही. मात्र सरकारची जबाबदारी म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ती खबरदारी घेत आहेत. याप्रकरणी काही लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. संजय राऊत हे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी योग्य रीतीने घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम गृहमंत्री आहेत, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

    IPL 2023: उत्साहाच्या भरात रवी शास्त्री काय बोलू गेले पाहा, हार्दिक पंड्या देखील गोंधळला

    दरम्यान, कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या नावाने शुक्रवारी संजय राऊत यांच्या मोबाइलवर एक संदेश आला होता. या संदेशात संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांनी याबाबत शुक्रवारी पोलिसांना माहिती दिली होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी शनिवारी सकाळी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.

    अजून बापटांच्या अस्थीचं विसर्जन नाही, अन् भावी खासदार म्हणून बॅनर लागले, जरा माणुसकी ठेवा, अजितदादांनी खडसावलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed