• Sat. Sep 21st, 2024
दिल्लीत पोस्टर लावले पोलिसांनी हटवले, आपनं पुढचं पाऊल टाकलं, आता कोल्हापूरमधून सुरुवात

कोल्हापूर: दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे फलक लागल्याने, सोशल मीडिया सह राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा सुरू झाली होती. सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या फलकांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम शहरात सुरू केली असल्याचे जाहीर केले. हे बॅनर आम आदमी पार्टी कडून दिल्लीच्या धर्तीवर लावण्यात आले असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

शहरात मोदी हटावो देश बचावचे पोस्टर

मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष एकवटत असतानाच गेल्या एकदोन आठवड्यापुर्वी पासून दिल्ली शहरात आम आदमी पार्टीने ‘ मोदी हटाओ देश बचाओचे ‘ हजारो फलक लावल्याने खळबळ उडाली होती. तर असाच प्रकार आज कोल्हापूर शहरात ही दिसून येत असून रातोरात हे फलक लागले आहेत. शहरातील रंकाळा टॉवर,माऊली चौक,तलवार चौक,हाॅकी स्टेडियम आदी चौकात लाल रंगाच्या फलकांवर पांढऱ्या अक्षरात मोदी हटावो,देश बचावो अश्या आशयाचे फलक लागले आहेत. या फलकांची फोटो बघता बघता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत तसेच जोरदार चर्चा देखील सुरू झाली आहे.

शहरात लागलेले हे बॅनर्स आम आदमी पार्टीने लावले आहेत. ही मोहीम म्हणजे केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात फुंकलेले रणशिंग आहे, असं आप नेत्यांनी सांगितलं. देशाला आता शिकलेला पंतप्रधान अपेक्षित आहे. या मोहिमेला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.तर ही मोहीम सुरूच राहणार असून शहरभरात आणखी बॅनर-पोस्टर लावले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी खरी आहे का?, लग्नाबद्दल प्रश्न विचारताच परिणिती चोप्राचा चेहरा खुलला

केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न, आपचा आरोप

ज्याप्रमाणे इंग्रजांनी देशातील नागरिकांवर दडपशाही केली, त्याच पद्धतीची दडपशाही मोदी सरकार करत आहे, असं आप नेत्यांनी म्हटलं. हिंडेनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एल आय सी, एस बी आय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली. परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला. गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारच्या कारकिर्दीत काही मोजक्या भांडवलदारांची ८ लाख कोटींची कर्जे माफ करण्यात आली आहेत.

भीषण! दुभाजक ओलांडून रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक; उड्डाणपुलावरून महिला पडली, जोडप्याचा अंत

शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते, परंतु शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत एका वर्षात निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन देखील मोदी सरकारला त्याबाबत निर्णय घेता आलेला नाही. ईडी-सीबीआय या केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आपच्या नेत्यांनी केला.

पार्टटाइम नोकरीचे आमिष, गरजूकडून घेतले साडेपाच लाख रुपये, फसवणूक झाल्याचे कळताच बसला मोठा धक्का

देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारख्या कायद्यांचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे. महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारला केंद्राच्या सत्तेतून पायउतार केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने देशभरात ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम देशभर सुरू केले असल्याचे संदीप देसाई यांनी सांगितले आहे. उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, अमरजा पाटील, संजय साळोखे, दुष्यंत माने, विजय हेगडे आदी यावेळी उपस्थित होते.

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांमधला वाद चव्हाट्यावर, IPL पूर्वीच संघात ठिणगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed