• Mon. Nov 25th, 2024

    घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, गुंगीचे औषध देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार

    घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, गुंगीचे औषध देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार

    कल्याण : एका १७ वर्षीय पीडित मुलाला बाहण्याने लॉजवर नेऊन ४० वर्षीय नराधमाने पीडित मुलाला थंड पेयात गुंगीचे औषध देऊन अनैसगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नरधामावर पोक्सोसह अनैसगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश दुसाने असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका भागात कुटुंबासह राहतो. तर आरोपी हा कल्याण पूर्वेतील पिसवली गावात राहतो. त्यातच २९ मार्च (बुधवारी) सकाळच्या सुमारास पीडित मुलगा घरानजीक असताना, नराधम आरोपी त्या ठिकाणी स्कुटी घेऊन आला होता. त्यावेळी पीडित मुलाला बहाण्याने स्कुटीवर बसून कल्याण पूर्वेतील एका लॉजवर घेऊन आला होता.

    केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ
    दिली ठार मारण्याची धमकी

    त्यानंतर लॉजच्या खोलीत पीडित मुलाला थंड द्रव्यात गुंगीचे औषध देऊन दोन वेळा अनैसगिक अत्याचार केला. शिवाय लैगिंक अत्याचार केले. या धक्कादायक घडललेल्या घटनेमुळे पीडित अल्पवयीन मुलगा भयभीत झाला असतानाच, नराधम आरोपीने त्याला घडललेल्या प्रकारची कुठे वाच्यता केल्यास, ठार मारण्याची धमकी दिली होती.

    मंडणगड दुधेरे येथील दुचाकीचा भीषण अपघात, युवकाचा दुर्देवी मृत्यू, १२ वीचे क्लास सुरू होते
    दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलाने नरधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करत आपले घर गाठून त्यावर घडलेल्या प्रकार त्याने आईला सांगितला. हे ऐकून पीडित मुलाच्या आईला मोठा धक्काच बसला. त्यानंतर पीडित मुलाला घेऊन आईने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून नरधामावर भादंवि, कलम ३७७, ५०६, आणि पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला केला.

    या गुन्ह्याच्या आधारावर नराधमाचा शोध घेऊन घटनेच्या दिवशीच सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. आज ३० मार्च रोजी आरोपी नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.
    काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *