• Sat. Sep 21st, 2024
खेळता खेळता टाकीत डोकावला, तोल गेल्याने खाली आपटला; लाडका लेक गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पाण्याच्या टाकीत पडून एका ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अभय रामदास दोरगे (वय ५ वर्ष ६ महिने) असं मृत मुलाचे नाव असून त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ही घटना मंगळवारी रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास दोरगे यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यांना दोन मुले असून त्यांची दोघे मुलं अक्षय आणि अभय घरासमोर खेळत होती. रामदास दोरगे यांनी पोल्ट्री फार्मसाठी एक सिमेंटची पाच फूट खोल अशी पाण्याची टाकी बांधलेली आहे. अक्षय आणि अभय खेळता खेळता या पाण्याच्या टाकीकडे गेली. त्यातील लहान मुलगा अभय हा पाण्याच्या टाकीकडे गेला. यावेळी घरातील कोणतीच माणसे त्यांच्यासोबत नव्हती. पाण्याच्या टाकीकडे डोकवत असताना अचानक अभयचा तोल गेला. तोल गेल्याने तो पाण्याच्या टाकीत पाच फुटावर जोरात आपटला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

नामिबियाच्या चित्त्याची गोड बातमी! ‘भारतीय’ चित्त्यांची पहिली पिढी अवतरली, आले नवे पाहुणे
मुलगा पडल्याचे समजल्यावर दोरगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली.

अभय हा दोरगे यांचा छोटा मुलगा होता. सर्वात छोटा असल्याने तो सर्वांचा लाडका होता. त्याच्या अचानक जाण्याने दोरगे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पाण्याच्या टाकी शेजारी मुलांना खेळायला पाठवताना त्यांच्या सोबत कुणी तरी मोठी माणसं असणे गरजेचं आहे. अन्यथा मुलांना या गोष्टीचा अंदाज नसतो की आपण काय करतो काय नाही. त्यामुळे मुले खेळत असताना त्यांच्या घरातल्या माणसाने आजूबाजूला असणे अत्यंत गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मग्रुरी सहन करणार नाही, हा DY पाटील कारखाना वाटला काय? रणांगणात या, मग बघतो : अमल महाडिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed