• Mon. Nov 25th, 2024
    झाडाखाली थांब, मी लगेच येते; मुलाला बसवून आईची समोरच विहिरीत उडी; १३ वर्षीय पोराचा टाहो

    नांदेड (अर्जुन राठोड) : नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डोक्यावर कर्जाचं डोंगर आणि त्यातच आजाराने त्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या १३ वर्षीय मुलाच्या डोळ्यादेखत विहरीत उडी मारून आत्महत्या केली. मीनाबाई पंजाबराव मेने (वय ३०) असं या महिलेचं नाव आहे. हदगांव तालुक्यातील चक्री गावातील रहिवासी असलेल्या मीनाबाई मेने ह्या मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होत्या.

    त्यांच्या डोक्यावर कर्ज देखील होतं. आपल्याला आलेला आजार आणि त्यातच डोक्यावर कर्ज असल्याने त्या मानसिक तणावाखाली होत्या. रविवारी दुपारी मीनाबाई मेने आपल्या १३ वर्षाच्या शिवम नामक मुलाला सोबत घेऊन शेताकडे गेल्या. त्यानंतर मुलाला “झाडाखाली बस मी लगेच येते”, असं म्हणत पळ काढला. आई का पळते म्हणून मुलगा देखील तिच्या पाठीमागे पळू लागला. शेताच्या काही अंतरावर असलेल्या विहरीत जवळ त्या थांबल्या आणि आपल्या मुलाकडे पाहून त्यांनी विहरीत उडी मारली.

    बाळासाहेब-वाजपेयींना मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली, तानाजी सावंतांची आत्मस्तुती
    आपल्या आईला विहरीत बुडताना पाहून त्या चिमुकल्या मुलाने आरडाओरडा देखील केली. मात्र, तिथे कोणीच नसल्याने अखेर तो मुलगा धावत पळत गावात गेला आणि आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांच्या मदतीने त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत महिलेच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पती असा परिवार आहे. चिमुकल्या मुलांच्या टाहोने गावकऱ्यांचे हृदय हेलावून गेले होते. दरम्यान, या प्रकरणी हदगांव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनं चक्री गावात शोककळा पसरली आहे.

    मुंबईकरांनो महिनाभर पाणी जपून वापरा, शुक्रवारपासून १५ टक्के पाणीकपात; वाचा सविस्तर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed