• Sat. Sep 21st, 2024
खांद्यावरुन हात काढ म्हटलं, त्यांची सटकली, चाकू काढला अन्… नागपुरात थरारक प्रसंग

Crime News: नागपुरात एका २७ वर्षीय तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत ढाब्यावर जेवायला गेलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्यावर वार करण्यात आले आहे. याने नागपुरात एकच खळबळ माजली आहे.

 

nagpur crime news
नागपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत दोन आरोपींनी एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. तरुणाने खांद्यावरून हात काढायला सांगितल्यामुळे आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना रविवारी रात्री ११.३० वाजता हिंगणा रोडवर असलेल्या देशमुख ट्रेडिंग कंपनीजवळ घडली. तरुणाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११.३० वाजता पीडित शिवम ओमप्रकाश सिंग (२७, बालाजीनगर, हनुमान मंदिर, हिंगणा रोड) हा त्याच्या इतर मित्रांसह पवन ढाब्यावर जेवण करून घराकडे चालला होता. देशमुख ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाजवळ येताच आरोपी मोनू शेख आणि मल्लू पासवान यांनी त्याला अडवले. यादरम्यान, आरोपी मोनूने शिवमच्या खांद्यावर हात ठेवला, तो काढण्यास सांगितले. आरोपी आणि पीडित एकमेकांना आधीच ओळखत होते.

२ कोटी कॅश, ६२ एकर जमीन, १ किलो सोनं; चार भावांकडून लाडक्या बहिणीला ८ कोटींच्या भेटवस्तू
या दोघांनी शिवमछ्या खांद्यावर हात टाकला. तेव्हा शिवमने खांद्यावरून हात काढायला सांगितलं. असे सांगताच दोन्ही आरोपींनी मी कोण आहे ते तुला माहीत आहे, असे म्हणत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आरोपी मल्लूने शिवमचे दोन्ही हात पकडून ठेवले, तर मोनूने जीवे मारण्याच्या उद्देशाने खिशातून धारदार शस्त्र काढून त्याच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला. पीडित व्यक्तीचे मित्र आणि तेथे उपस्थित असलेले इतर लोक त्याला वाचवण्यासाठी धावले असता आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

या प्रकरणाची माहिती तातडीने एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिवमला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed