केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रविवारी ख्यातनाम वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात जास्त रस असल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले की, मी एकदा लोकांनाही सांगितले की पुष्कळ झाले आता, मी पण निवडून आलो. लोकांनो, तुम्हाला पटले तर मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरींनी जाहीरपणे सांगितले.वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
संघाच्या पाठिंब्याने गडकरींचं मंत्रीपद वाचलं, खैरेंचा मोठा दावा
नुकतीच नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गेल्या आठवड्यात गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांच्याच कार्यालयात आला होता. यांच्या जनसंपर्क कार्यालयात २१ मार्चला सकाळच्या सुमारास दोन वेळा धमकीचा फोन आला. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. नागपुरातील नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात हा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.
लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही: नितीन गडकरी
वेस्ट लँडवर बांबू लागवड केली तर ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. त्यातून पर्यावरण रक्षणासोबत रोजगारनिर्मितीही होऊ शकते, असे गडकरी यांनी सांगितले. लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही. आपलेही हित लोकांना कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्त्व समजत नाही, अशी खंत गडकरींनी व्यक्त केली. मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या विषयांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वातावरण बदल हा विषय काही लोकांचा आहे, असेही गडकरी यांनी यावेळी म्हटले.