• Sat. Nov 16th, 2024
    परमेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, रथाचे दगडी चाक निखळले; २ भाविकांचा मृत्यू

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी अक्कलकोट शहरापासून २० किमीच्या अंतरावर असलेल्या वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर महाराजांची यात्रा होती. आजूबाजूच्या दोन ते तीन गावचे ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते. उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे हा धार्मिक विधी होता. या धार्मिक कार्यक्रमात रथ ओढताना अचानकपणे रथाचा दगडी चाक निखळला. चाक निसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली आहे.या दुर्घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावे संजय नंदे, गंगाराम गाडीवार अशी आहेत. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात छिन्नविच्छिन्न झालेल्या अवस्थेत मृतदेह शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.

    बुलडाण्यात खळबळ! फिरायला जातो असे सांगून बाहेर पडलेला शिक्षक परतलाच नाही, घडले धक्कादायक
    देवाच्या रथाचे चाक निखळून दोघांचा मृत्यू

    अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होती. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते. यात्रेतील मुख्य घटक म्हणून रथ ओढणे आहे. परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक रथ ओढतात. सुमारे १ फूट रुंदी असलेला रथाचे गोलाकार दगडी चाकं आहेत. रथ ओढणे या धार्मिक विधीच्या वेळी परमेश्वर महाराज की जय…! ची घोषणा दिली जाते व रथावर खारीक प्रासादिक वस्तूंचे उधळण केली जाते.

    विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा
    यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द

    यंदा रविवारी सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे दगडी चाक निखळले. ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत संजय नंदे, गंगाराम गाडीवर हे भक्त गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करम्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची कळते.
    होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed