उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे दोन प्रदेशाध्यक्ष, पहिले चंद्रकांतदादा पाटील, जेव्हा सत्तांतर झालं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की आम्ही हृदयावर दगड ठेवून हे ओझं उरावर घेतलं आहे. म्हणजे हे मिंधे ओझं आहे त्यांच्यासाठी. तर आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही मिंधे गटाला फक्त ४८ जागा देणार. अरे तुमच्या नावाप्रमाणे ५२ जागा तरी द्या त्यांना, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली.
तर, मी भाजपाल विचारतो मिध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार का, हे भाजपने जाहीर करावे, असं आव्हानंही त्यांनी दिलं. तसेच, जर भाजपला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. अरे तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना दूर करु शकत नाही, प्रयत्न करुन पाहा, तातडीने निवडणुका घ्या. हिम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मत मागा मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो, बघू महाराष्ट्र कोणाला कौत देतो, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिला.
आधी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली, मग म्हणाले संसदीय शब्द आहे हा !
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही जोरदार टीका केली. “स्वत:कडे कर्तृत्व शून्य, गद्दारीकरून मुख्यमंत्री झाले तरी कर्तृत्व शून्य आहे. अजूनही माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतं, हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला, त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्यासमोर फिरतील”
भाजपने त्यांच्या पक्षाचं नाव बदलावं
भ्रष्टाचाराविरोधात लढाई कोण करणार भाजप, पण भाजपने एक लक्षात ठेवावं कन्याकुमारी ते केरळ यादी काढली तर तुम्ही विरोधीपक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना पक्षात घेतलं आहे. सगळी भ्रष्ट माणसं पक्षात घेतल्यानंतर पक्षाचं नाव बदला. भारतीय जनता भ्रष्ट नाही, भाजप हा भ्रष्ट झालेला पक्ष असं नाव ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.