• Mon. Nov 25th, 2024

    नवी मुंबईतील दर्ग्याकडे मनसेचे बोट, हे अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा…; गजानन काळेंचा इशारा

    नवी मुंबईतील दर्ग्याकडे मनसेचे बोट, हे अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा…; गजानन काळेंचा इशारा

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रातील दर्ग्याकडे बोट दाखवत तो अवैध असल्याचे म्हटले होते.त्यानंतर अशा प्रकारच्या अवैध दर्गा बांधकामांकडे मनसैनिकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृत मशिदी बाधण्यात आल्या असून त्या हटविण्यात याव्यात असे मनसेने मागणी केली. आता नवी मुंबईत देखील अशीच मागणी होऊ लागली आहे.मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी नवी मुंबईतील पामबीच मार्गाजवळ असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘नवी मुंबई पामबीच मार्गावर असलेल्या मरीन नेव्ही युनिव्हर्सिटी असलेल्या चाणक्य इमारतीला लागूनच अतिक्रमण करून हा दर्गा उभारण्यात आला आहे …शेजारी कांदळवन आणि समुद्रकिनारा आहे … आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) दृष्टीक्षेपात आहे … मुळातच हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे … @CIDCO_Ltd @Navimumpolice @mahamaritime @ThaneCollector @DrSanMukherjee @NMMCCommr कारवाई करावी …’

    मुंबई महापालिकेचा कॅग अहवाल सादर; बीएमसीवर ताशेरे, फडणवीसांचा इशारा, ठाकरे गटाची ही मागणी
    तत्काळ कारवाई करावी अन्यथा…

    गजानन काळे यांनी या प्रकरणाबाबत म्हटले आहे की, ‘नवी मुंबईतील पामबीच मार्गालगत टीएस चाणक्या इंडियन मेरीटाइम्स युनिव्हर्सिटी आहे. त्याच्या भिंतीला लागूनच मोठ्या जागेवर अतिक्रमण करून तेथे दर्गा बांधण्यात आला आहे. बाजूलाच कांदळवन आहे. तसेच समुद्र किनारा आहे. आणि समोरच्या बाजूला बीएआरसी आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा अतिसंवेदनशील भाग आहे. अशा परिसरात मोठ्या प्रमाणात जागा करून, रस्ता रुंद करून हा दर्गा बांधण्यात आला आहे.’

    तुम्ही माझी कॉपी करू नका, मी तर बैल आहे, बेडकाने बैलासारखं होऊ नये; बिचुकलेंचा टोला
    नवी मुंबईत मरीन युनिव्हर्सिटी आहे. माझी राज्य सरकारला, सिडकोला, वन विभागाला, मेरिटाईम बोर्ड, ठाणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना विनंती आहे की, हे अतिक्रमण आहे, राज ठाकरे म्हणतात तसं जागा बळकावण्यात आलेली आहे आणि हे आक्रमण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा धोका आहे. आपण तत्काळ या गोष्टीवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाइलने गणपतीबाप्पाचं मोठं मंदिर इथे आम्ही नक्की उभारू, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.

    लेखक राहुल बनसोडेंची मनाला चटका लावणारी अकाली एक्झिट; चवदार तळ्यावर शेअर केलेली अखेरची पोस्ट ठरली होती लक्षवेधी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *