• Mon. Nov 25th, 2024

    भाजपच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो; चर्चेला उधाण, लोक म्हणतायत हे भाजप-मनसे युतीचे संकेत

    भाजपच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो; चर्चेला उधाण,  लोक म्हणतायत हे भाजप-मनसे युतीचे संकेत

    डोंबिवली : भाजपच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांचे बॅनर व्हायरल झाले आहेत. या बॅनरमध्ये त्यांनी भाजपचे कॅबिनेट मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात भोपर-देसलेपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांचे या बॅनरमधून आभार मानण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

    विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात आपण आगामी काळात सर्व महापालिका निवडणुका जिंकू आणि सत्तेतच राहू असं विधान केलं. विशेष म्हणजे या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी बातमी समोर आली आहे.

    हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स, कागलमध्ये तणावपूर्ण वातावरण
    भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा फोटो झळकला आहे. त्यामुळे शहरात मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानत ट्विट सुद्धा केले आहे.

    ज्येष्ट नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
    मनसे आमदार यांनी केलेलं ट्विट…

    ‘महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातील १) मानपाडा रोड ते देसलेपाडा-भोपर मुख्य रस्त्याचे कॉंक्रिटीकरण – रु. २० कोटी. २) कल्याण-शीळ रस्त्यावरील जंक्शन सुधारणा व सुशोभिकरणासाठी – रु. ४ कोटी, ३) टाटा पॉवर-बंदिश पॅलेस रस्ता – ६ कोटी अशी एकूण ३० कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिल्याबद्द्ल सा.बा.मंत्री श्री. रविंद्रजी चव्हाण यांचे धन्यवाद !’
    शासकीय दवाखान्यातील डॉक्टरला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, कारण जाणून तुम्हाला कीव करावीशी वाटेल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *