सतीश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आश्विन या त्यांच्या शर्यतीच्या बैलावर जीवापाड प्रेम आहे. दरवर्षी ते या बैलाचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात. आज आश्विन या बैलाचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदा तर त्यांनी चक्क गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आज सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या लावणी कार्यक्रमामुळे गावकऱ्यांसह परिसरातील लावणी शौकिनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी गावात सुरू आहे. यासाठी गावामध्ये एका शेतात मोठं स्टेज उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी गावात सुरू आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी साताऱ्यातल्या खोजेवाडी गावात पाच वर्षाच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील चा कार्यक्रम पार पडला होता. मात्र, आता एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडत असल्यामुळे याची चर्चा परिसरात चांगलीच रंगू लागली आहे.
गौतमी पाटीलचे कार्यक्रम आणि वाद हे समीकरण पाहायला मिळत असलं तरी तिच्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो. राज्यभरात विविध ठिकाणी तिच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. गौतमी पाटीलच्या नाशिकच्या निफाडमधील कार्यक्रमाची देखील जोरदार चर्चा झाली होती. त्या कार्यक्रमात वयोवृद्धांना देखील गौतमीच्या नेतृत्त्वाची भूरळ पडली होती.