• Sun. Sep 13th, 2026

स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

ByMH LIVE NEWS

Mar 7, 2023
स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि.७: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन उद्या बुधवारी सकाळी ९ वा. कामा व आल्ब्लेस रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून पुढील काळात स्तन कर्करोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हा कक्ष प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यरत असेल.

०००

वि.स.अ./श्रीमती वर्षा आंधळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed