• Sat. Sep 12th, 2026

गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन

ByMH LIVE NEWS

Feb 13, 2023
गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन

मुंबई प्रतिनिधी

 बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

https://9300ba32e7be9d671abc25103939558a.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-40/html/container.html

बीकेसी येथील गुगल इंडियाच्या दूरध्वनीवर रविवारी दूरध्वनी आला होता. शिवानंदने केलेल्या या दूरध्वनीत त्याने पुणे गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांना याबाब माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर गुगलच्या वतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवानंदविरोधात ५०५ (१) (ब) व ५०६ (२) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता दूरध्वनी हैद्राबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार बीकेसी पोलिसांचे एक पथक हैद्राबादला रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed