• Sat. Sep 21st, 2024

आदिवासी समाजाला शबरीमाता योजनेतून घरकुल द्या! आमदार भीमराव केराम यांची विधानसभेत मागणी

ByMH LIVE NEWS

Dec 31, 2022

नागपूर – प्रतिनिधी

किनवट माहूर तालूका हा आदिवासी व डोंगराळ भाग असून या दोन्ही तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे परंतू आजपर्यंत अनेक आदिवासी कुटुंब शबरी माता योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. दोन्ही तालुक्यातील गोरगरीब आदिवासी कुटुंब उघड्यावर वास्तव्य करीत आहे ही बाब लक्षात घेऊन नागपूर येथे पार पडलेल्या अधिवेशन काळात विधानसभेत माझ्या किनवट माहूर मतदार संघातील आदिवासी कुटुंबांना शबरीमाता घरकुल योजनेतून घरकुल देण्यात यावे अशी मागणी केली असता याबाबत आजपर्यंत 85हजार लाभार्यांना शबरी माता योजनेतून घरकुल देण्यात आले असून ज्यांनी घरकुलासाठी प्रस्ताव दाखल केले अशा सर्वांना घरकुल देण्यात यावे यासाठी सर्वच आदिवासी प्रकल्प अधिकार्‍यांना आदेशीत केले असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
आमदार भीमराव केराम यांनी शबरीमाता योजनेतून आदिवासी समाजाला घरकुल मिळवुन देण्याची मागणी केली व त्यांच्या मागणीला यशही आलेअसुन किनवट माहूर मतदारसंघातील जनतेने त्यांना धन्यवाद देउन आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed